Join us

रवी शास्त्रींचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार; राहुल द्रविडचं नाव चर्चेत, कपिल देव यांचं मोठं विधान 

विराट कोहली अँड टीमला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:10 IST

Open in App
ठळक मुद्देरवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार आहे, त्यानंतर ते पुन्हा समालोचन करताना दिसू शकतील

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड ( Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे श्रीलंकेत शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील संघ पाठवण्यात आला आहे. विराट कोहली अँड टीमला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं आणि त्यामुळे आता प्रशिक्षक बदलाची मागणी होत आहे. त्यासाठी राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे, परंतु भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं विधान केलं आहे.

IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!

द्रविड २०१४ मध्ये फलंदाज सहाय्यक म्हणून भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम  केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे आणि त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवण्यात यावं अशी मागणी होत आहे. 

कपिल देव यांचा मात्र रवी शास्त्री यांनाच पाठिंबा आहे. ABP न्यूजसोबत बोलताना ते म्हणाले, यावर चर्चा करायला हवी, असं मला वाटत नाही. श्रीलंका दौरा संपल्यानंतर संघाच्या कामगिरीनंतरच याबाबत चर्चा करायला हवी. नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यात काही चुकीचे नाही. पण, रवी शास्त्री चांगलं काम करत आहेत आणि त्यांना हटवण्याचं कोणतंच कारण मला दिसत नाही. येणाराच काळच याबाबत सांगेल. पण, त्याआधीच अशी चर्चा करून प्रशिक्षक व  खेळाडूंवर उगाच दबाव निर्माण करण्यासारखं होईल.''

श्रीलंका दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाल्याचा कपिल देव यांनाही आनंद झाला आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार आहे, त्यानंतर ते पुन्हा समालोचन करताना दिसतील. ( Ravi Shastri might return to commentary box after T20 World Cup in UAE this year. The iconic voice will be back after almost 5 years.) 

 

टॅग्स :रवी शास्त्रीराहूल द्रविडकपिल देव