IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!

IPL 2022 Mega Auction : मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील. बीसीसीआयच्या या नियमानंतर सोशल मीडियावर सुरेश रैनाचं नाव ट्रेंड होऊ लागलं. चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सनी आयपीएल २०२२ साठी चार खेळाडू संघात पाहायला आवडतील त्यात रैनाला वगळून ऋतुराज गायकवाडला पसंती दिली आहे. कोणता संघ कोणत्या चार खेळाडूंना कायम राखू शकतो हे जाणून घेऊया...IPL franchises are allowed to retain either 3 Indians and 1 overseas or 2 Indians and 2 overseas for IPL 2022

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना/ऋतुराज गायकवाड; जर धोनीनं निवृत्ती घेतली तर रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड व मोईन अली

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ/शिखर धवन

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या/ किरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक

पंजाब किंग्स ( Punjab Kings) - लोकेश राहुल, मोहम्मद शमी, ख्रिस गेल, रिली मेरेडीथ

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट

रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Bangalore ) - विराट कोहली, मोहम्मद सिराज, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन