Join us

"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नाणेफेकीपूर्वीच ठरवायला हवा, असे गांगुली यांनी नमूद केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 11:12 IST

Open in App

Sourav Ganguly On Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या चर्चेत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा प्रशिक्षक कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लवकरच कार्यकाळ संपणार आहे. अनेक माजी खेळाडू या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र, नक्की कोणी या पदासाठी अर्ज केला आहे हे स्पष्ट नाही. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अशातच गांगुलींनी गंभीरबाबत एक मोठे विधान केले आहे. 

सौरव गांगुली म्हणाले की, मला आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर आवडतो. आयपीएलमध्ये फक्त एकच गोष्ट आहे की मैदान मोठे असायला हवे. नाहीतर ही एक उत्तमच स्पर्धा आहे. मला वाटते की, इम्पॅक्ट प्लेअरचा निर्णय नाणेफेकीपूर्वीच घेतला पाहिजे. गौतम गंभीरने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असेल तर तो एक योग्य उमेदवार आहे. आपल्या देशात प्रचंड प्रतिभा आहे, भारतीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणारे खेळाडू आहेत. गौतम गंभीरने अर्ज केला आणि बोर्डाने त्याला ते काम दिले तर आनंदच वाटेल. 

दरम्यान, मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे  देखील समोर आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी अशा काही बनावट नावांचा समावेश आहे. BCCI ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता. गंभीरने या पदासाठी अर्ज केला असेल भूमिका स्वीकारली असली, तर त्याला KKRचे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान सोडावे लागेल. गंभीरने कर्णधार म्हणून KKR सोबत दोन वेळा आयपीएल जिंकली आहे.  

BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघगौतम गंभीर