Join us

क्रिकेटच्या 'शुद्धिकरणा'साठी आयसीसीचे 'इंटेग्रिटी अॅप', फिक्सरच्या डोक्याला ताप!

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने ' इंटेग्रीटी ॲप' तयार केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 16:28 IST

Open in App
ठळक मुद्देभ्रष्टाचार आणि उत्तेजक यांच्यासदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाली झाल्यास त्याची तक्रार ॲपवरून करता येणार आहे.

ज्युरीच - क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने ' इंटेग्रीटी ॲप' तयार केले आहे. हे ॲप खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफ यांच्यासाठी असणार आहे. या अॅपमुऴे फिक्सरच्या डोक्याला ताप होणार आहे.

हे ॲप कशी मदत करेल?आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि उत्तेजक प्रतिबंधक विरोधी कायद्यांची सर्व माहिती या ॲपवर उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय भ्रष्टाचार आणि उत्तेजक यांच्यासदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाली झाल्यास त्याची तक्रार ॲपवरून करता येणार आहे. त्याबद्दलची सर्व मार्गदर्शनही ॲपव्दारे करण्यात येणार आहे.  

चाचणी नंतर लॉन्चिंगकाही महिन्यांपूर्वी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान या ॲपची चाचणी करण्यात आली होती. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हे ॲप फायद्याचे असल्याचे नमूद केले होते आणि क्रिकेटमधून भ्रष्टाचाराला हद्दपार करण्यासाठी हे प्रोत्साहन देणारे आहे, असेही ते म्हणाले होते. याशिवाय इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक हैदी टिफेन यांनीही या ॲपचे गोडवे गायले आहेत

टॅग्स :क्रिकेटभारतआयसीसीक्रीडाराहूल द्रविडक्रिकेट सट्टेबाजी