ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळेल, याची सर्वांना खात्री होती. पण, नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 50वा विजय ठरला. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 137 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने 77 विजय मिळवले आहेत.
11:01 PM
अॅलेक्स कॅरीचे 25 चेंडूंत अर्धशतक
09:55 PM
ICC World Cup 2019, IND vsAUS : धोनीचाखणखणीतषटकारअन्कोहलीथक्क, Video https://t.co/5mC1zcwxCx#indvaus#teamindia#CWC19#ViratKohli#MSDhoni
— Lokmat(@MiLOKMAT) June 9, 2019
09:01 PM

08:34 PM

08:32 PM
महेंद्रसिंग धोनीनं बलिदान बॅजवाले ग्लोव्हज घातले नाही

08:23 PM
चौदाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाला 61 धावांवर पहिला धक्का बसला. फिंचने 35 चेंडूंत 36 धावा केल्या.
08:08 PM
ऑस्ट्रेलियाच्या 10 षटकात बिनबाद 48 धावा

07:31 PM
जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात चेंडू यष्टिंवर आदळूनही डेव्हिड वॉर्नर बाद झाला नाही. वॉर्नरच्या बॅटिची कड घेऊन चेंडू यष्टिंवर आदळला, परंतु बेल्स कायम राहिल्यानं तो बाद झाला नाही
06:12 PM
पांड्या व कोहलीची अर्धशतकी भागीदारी
05:57 PM
हार्दिक पांड्याचा सोपा झेल सोडला
05:19 PM
शिखर धवन आणि विराट कोहलीची अर्धशतकी भागीदारी

03:48 PM
भारताच्या 10 षटकांत 41 धावा
03:47 PM
शिखर धवनच्या अंगठ्यावर चेंडू आदळला, पॅट कमिन्सच्या बाऊंसवर धवनला दुखापत; फिजीओची मैदानावर धाव

03:40 PM
अवघं ओव्हल झालं भारतमय!
03:39 PM
डेव्हिड वॉर्नरची स्ट्रॅटजी
ICC World Cup 2019 IND vsAUS : भारतीयगोलंदाजांचासामनाकरण्यासाठीडेव्हिडवॉर्नरची'सेंसर' स्ट्रॅटजी! https://t.co/OuYdswFqdt#INDvAUS#CWC19@cricketworldcup@BCCI#TeamIndia
— Lokmat(@MiLOKMAT) June 9, 2019
03:34 PM
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिखर धवनच्या 9000 धावा पूर्ण
03:21 PM
पाच षटकांत भारताच्या बिनबाद 18 धावा, रोहित शर्माच्या 10, तर शिखर धवनच्या 7 धावा
03:09 PM
नॅथन कोल्टर नायलने झेल सोडला

02:46 PM
ओव्हल मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं 71पैकी 39 वेळा विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाने सलग दहा वन डे सामन्यांत विजय मिळवला आहे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी रोहित शर्माला 20 धावांची गरज आहे
02:39 PM
कसे आहे स्टेडियमबाहेरील वातावरण?
02:35 PM
भारतीय संघात कोणताही बदल नाही, ऑस्ट्रेलियाचा संघही तोच

Web Title: ICC World Cup 2019 IND vs AUS live update, India VS Australia Match Score, Highlight, news in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.