ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल

ICC Women’s World Cup 2025 Matches Shifted : बंगळुरुच्या मैदानातील सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित; मुंबईला फायनलची मेजवानी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:01 IST2025-08-22T15:50:47+5:302025-08-22T16:01:28+5:30

whatsapp join usJoin us
ICC Women’s World Cup 2025: ...then the thrill of the ODI World Cup final will be played at the Navi Mumbai ground | ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल

ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women’s World Cup 2025 Matches Shifted From Bengaluru To Mumbai : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली  महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ८ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा सुरु होण्याआधी ठरलेल्या नियोजनात बदल करण्याची वेळ आली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बंगळुरुच्या मैदानातील सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीसह अंतिम सामन्यासह साखळी फेरीतील लढती बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार होत्या.  पण  कर्नाटक सरकारने या मैदानात सामने खेळवण्यावर बंदी घातली आहे.  IPL चॅम्पियन RCB च्या विजयी जल्लोष साजरा करताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. परिणामी ICC महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील  बंगळुरुच्या मैदानातील नियोजित सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.

Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर

आता गुवाहटीच्या मैदानात रंगणार सलामीची लढत

३० सप्टेंबरला बंगळुरुच्या मैदानात रंगणारा  भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना आता गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येईल. याशिवाय इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ ऑक्सोटबरची लढत ही देखील याच मैदानात रंगल्याचे पाहायला मिळेल.

...तर नवी मुंबईच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार

२० ऑक्टोबरला कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यासह बंगळुरुच्या मैदानातील दोन लढती या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येतील. यात भारत विरुद्ध न्यूझीलं (२३  ऑक्टोबर)  आणि भारत विरुद्ध बांगलादेश (२६ ऑक्टोबर) या सामन्यांचा समावेश आहे. जर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ फायनलच्या शर्यतीतून आउट झाला तर हा सामना भारतीय मैदानात खेळवण्यात येणार आहे. जो नवी मुंबईत खेळवला जाईल. याउलट पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये असेल तर अंतिम सामना हा कोलंबोच्या मैदानात खेळवला जाईल.
 

Web Title: ICC Women’s World Cup 2025: ...then the thrill of the ODI World Cup final will be played at the Navi Mumbai ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.