Deepti Sharma Creates History Becomes 1st Indian Cricketer Repeat The Feat Twice : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात धमाकेदार केलीये. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला मात देत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या सामन्यात ऑलराउंडर दीप्ती शर्मा हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फलंदाजी वेळी संघ अडचणीत असताना तिने अर्धशतकी खेळी साकरली. त्यानंतर गोलंदाजीतही चमक दाखवली. अष्टपैलू कामगिरीसह तिने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. एक नजर टाकुया श्रीलंकेविरुद्ध दीप्ती शर्मानं सेट केलेल्या विक्रमी कामगिरीवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिफ्टी प्लस धावसंख्येसह तीन विकेट्स घेत साधला मोठा डाव
गुवाहाटीच्या मैदानात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. आघाडीच्या फळीतील बॅटर्सच्या फ्लॉप शोनंतर दीप्ती शर्मानं आपल्या भात्यातून महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. तिने ४ चौकाराच्या मदतीने ५३ चेंडूत ५३ धावा केल्या. याशिवा गोलंदाजीत तिने १० षटकांत ५४ धावा खर्च करत ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. वनडेत दुसऱ्यांदा तिने फिफ्टी प्लस धावसंख्येसह ३ विकेट्सचा डाव साधला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय ठरलीये. याशिवाय वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर पोहचल्या. फक्त झुलन गोस्वामीच तिच्या पुढे आहे.
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
भारताकडून महिला ODI मध्ये ५०+ धावा व ३ पेक्षा अधिक विकेट्सचा रेकॉर्ड
- शिखा पांडे ५९ ३/१९ दक्षिण आफ्रिका बेंगळुरू २०१४
- दीप्ती शर्मा ५१* ३/२० आयर्लंड पॉटचेस्ट्रूम (विद्यापीठ) २०१७
- जेमिमा रॉड्रिग्ज ८६ ४/३ बांगलादेश मीरपूर २०२३
- दीप्ती शर्मा ५३ ३/५४ श्रीलंका गुवाहाटी २०२५