IND W vs AUS W 2nd Semi Final Jemimah Rodrigues Emotional After Player of the Match : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने विक्रमी विजयासह गत चॅम्पियन आणि सातवेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर काढत फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात जेमिमा रॉड्रिग्जनं नाबाद शतकी खेळी साकारली. धावांचा पाठलाग करताना जेमीनं अर्धशतक आणि शतकी खेळीनंतर सेलिब्रेशन केले नाही. पण विजयी धाव घेताच तिला अश्रू अनावर झाले. एवढेच नाहीतर मॅचनंतर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार घेताना तिला हुंदका दाटून आल्याचे दिसून आले. भारतीय संघाला फायनल जिंकून देणं एवढेच डोक्यात होते. त्यामुळे अर्धशतक किंवा शतकानंतर आनंद व्यक्त केला नाही, ही गोष्टही तिने यावेळी सांगितली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅच विनिंग खेळीनंतर नेमकं काय म्हणाली जेमिमा?
सामन्यानंतर मॅच विनिंग शतकी खेळीवर जेमिमा म्हणाली की, सुरुवातीला मी फक्त खेळावर लक्षकेंद्रीत केलं. मी स्वतःशी बोलत होते. शेवटच्या टप्प्यात मी बायबलमधील एक श्लोक मनात म्हणत होते. माझ्या मनात खूप काही चालू होतं, पण मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. संघाला पाच विकेट्स राखून विजय मिळाल्यावर भावना अनावर झाल्या, असे ती म्हणाली.
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
दमलेल्या जेमीला दीप्तीमुळे मिळाला बूस्ट
ज्यावेळी हॅरी दी (हरमनप्रीत कौर) मैदानात उतरली त्यावेळी आम्ही एक उत्तम भागीदारी करण्याचं ठरवलं. एक क्षण असाही आला जेव्हा मी खूप थकले होते. दीप्ती प्रत्येक चेंडूनंतर माझ्याशी संवाद साधत होती, मला प्रोत्साहन देत होती. खेळणं असह्य वाटत असताना मी स्वत:ला पुश करत होते. माझ्या सहकाऱ्यांनी मला पुढे नेलं. हा विजयात फक्त माझ्या एकटीचा वाटा नाही, घरच्या मैदानात चाहत्यांनी चीअर केलं त्यामुळेही बळ मिळालं. हे सगळं एक स्वप्नासारखं वाटतंय, असं जेमिमा सामन्यानंतर म्हणाली.