Amol Muzumdar Aavishkar Salvi And Munish Bali Hero Behind India Crowned Women's World Champions : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या वर्ल्ड कप २०२५ च्या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्या दोन सामन्यातील दिमाखदार विजयानंतर यंदाच्या हंगामात भारतीय संघावर सलग तीन पराभवाची नामुष्की ओढावली होती. या धक्क्यानंतर भारतीय संघ अव्वल चारमध्ये पोहचेल की, नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण ज्या चुका केल्या त्या भरून काढत टीम इंडिया सेमीत मजल मारून थांबली नाही तर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकून पहिली वहिली ट्रॉफीही जिंकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाला 'ब्लॉकबस्टर शो'; संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणारे पडद्यामागचे ३ हिरो
भारतीय संघाच्या विजयात प्रत्येकीनं मोलाचा वाटा उचलला साखळी फेरीतील लढतीत स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या दोघींनी कमालीची कामगिरी करून दाखवत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. गोलंदाजी अवघ्या १७-१८ सामन्यांचा अनुभव असणाऱ्या श्री चरणीसह दीप्ती शर्मा अडचणीत सापडलेल्या संघाच्या मदतीला धावली. नॉकआउट्समध्ये जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं सेमी फायनलची मॅच गाजवली. फायनलमध्ये संघाचा भाग नसलेल्या शफालीनं वाइल्ड कार्ड एन्ट्री मारत विक्रमी कामगिरीसह संघासाठी बॉटिंग बॉलिंगमध्ये अविस्मरणीय कामगिरी बजावली. मेगा फायनलमध्ये अमनजोत कौरचा फिल्डिंगमधील सर्वोत्तम दर्जा हा भारतीय संघ तिन्ही स्तरावर परिपूर्ण असल्याची झलक दाखवणारा होता. एकंदरीत संघाचा भाग असलेल्या प्रत्येकीनं उपयुक्त योगदान देत ऐतिहासिक विजय साकार करण्यात मोलाची कामगिरी बजावली. एखादा पिक्चर ब्लॉकबस्टर ठरतो त्यावेळी हिरो अन् होरोईनची चर्चा होते. आपल्याकडे बऱ्याचा हिरोच भाव खातो. पण हिट शोमागे अनेकजणांची मेहनत असते. ही गोष्ट टीम इंडियाच्या बाबतीतही लागू होते. चला तर मग जाणून घेऊयात या साऱ्याजणींना त्रिसूत्री धोरणासह वर्ल्ड चॅम्पियन होण्यास तयार करणाऱ्या ३ पडद्यामागच्या हिरोंसदर्भातील खास गोष्ट
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
अमोल मजूमदार- महिला संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा प्रमुख रणनीतीकार
भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनी प्रयत्न आणि नियोजन या गोष्टीवर विश्वास ठेवत संघाला पुढे नेण्याची रणनिती आखली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडूनही टीम इंडियाकडून एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या या चेहऱ्यानं भारतीय संघाची फलंदाजी अधिक भक्कम झाली. अमोल मजूमदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. फुटवर्क, शॉट सिलेक्शन आणि स्पिनविरुद्ध खेळण्याच्या सर्वोत्तम तंत्र जपण्याचा त्यांचा मंत्र टीम इंडियाच्या कामी आला. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफालीच्या फलंदाजी बहरण्यात ही गोष्ट महत्त्वपूर्ण ठरली. निकाल काय लागतो यापेक्षा रोजच्या छोट्या मोठ्या चुका सुधारून सर्वोत्तम होण्याचा धडा त्यांनी महिला क्रिकेट संघाला दिला अन् त्याचं फळं वर्ल्ड चॅम्पियनच्या रुपात मिळालं.
गोलंदाजीतील 'अविष्कार'
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अविष्कार साळवी हे भारतीय महिला संघाचे गोलंदाजी कोच होते. डेटा आधारित कोचिंगवर स्मार्ट बॉलिंग प्लॅन आखण्यात माहिर असलेल्या या चेहऱ्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीत नवा 'अविष्कार' पाहायला मिळाला. गोलंदाजाची शैली ओळखून आणि बॅटरच्या ताकदीचा अभ्यास करून गेम प्लॅन तयार करण्यासोबत वेगापेक्षा अचूक टप्प्यावर करेक्ट कार्यक्रम करण्याचा त्यांचा गेम प्लॅन टीम इंडियासाठी फायद्याचा ठरल्याचे दिसून आले. मुनीश बाली-फिल्डिंगचा जादूगार
आता वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं म्हणजे फक्त बॅटिंग आणि बॉलिंग सर्वोत्तम असून चालत नाही. मैदानात फिल्डिंगमध्येही सर्वोत्तम योगदान द्यावे लागते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अमनजोत कौरनं डायरेक्ट थ्रोसह टीम इंडियाला मिळवून दिलेली पहिली विकेट आणि तिने शतकी खेळी करून टीम इंडियासाठी धोकादायक ठरत असलेल्या लॉराचा घेतलेला अप्रतिम झेल हा फिल्डिंग कोच मुनीश बाली यांनी टीम इंडियात केलेल्या जादूई बदलाची एक खास झलकच होती.
Web Summary : Amol Muzumdar, Aavishkar Salvi, and Munish Bali orchestrated India's World Cup win. Muzumdar strengthened batting, Salvi revolutionized bowling, and Bali transformed fielding. Their combined efforts led the team to victory.
Web Summary : अमोल मजूमदार, आविष्कार साल्वी और मुनीश बाली ने भारत की विश्व कप जीत का संचालन किया। मजूमदार ने बल्लेबाजी को मजबूत किया, साल्वी ने गेंदबाजी में क्रांति ला दी और बाली ने फील्डिंग को बदल दिया। उनके संयुक्त प्रयासों से टीम को जीत मिली।