ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट

ड्रेसिंग रूममधील मिटींगमध्ये चर्चा, पण फिरकीचा पर्याय सोडून जिंकण्यावर केला फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:06 IST2025-08-09T13:00:59+5:302025-08-09T13:06:02+5:30

whatsapp join usJoin us
ICC Warned India Of Heavy Punishment Over This Act In 5th Test vs England Report But Gautam Gambhir Said | ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट

ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाने रोमहर्षक विजय नोंदवत इतिहास रचला. परदेशातील मैदानात पहिल्यांदाच भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला ४ विकेट्स हाती असताना ३५ धावांची गरज होती. पण सिराज अन् प्रसिद्ध कृष्णा जोडीनं सर्वोत्तम गोलंदाजी करत २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मियाँ मॅजिक शिवाय गंभीरचा खंबीर निर्णयही या सामन्याचा टर्निंग पाँइट ठरला. कारण ICC नं वॉर्निंग दिल्यावरही गंभीर आपल्या रणनितीवर ठाम राहिला अन् भारतीय संघाने विजयाचा डाव साधला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग

'दैनिक जागरण'नं भारतीय संघाशी संलग्नित सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एका बाजूला इंग्लंडला विजयासाठी फक्त ३५ धावा हव्या होत्या. दुसरीकडे सामना जिंकून मालिका वाचवण्याची रणनिती आखत असलेल्या टीम इंडियाला ICम सामनाधिकारी (मॅच रेफरी) जेफ क्रो यांनी एक खास संदेश पाठवला होता. भारतीय संघ निर्धारित वेळेनुसार, ६ षटके मागे आहे. जर ओव्हर रेमध्ये सुधारणा केली नाही तर WTC मधील चार गुण कमी केले जातील, अशी वॉर्निंग टीम इंडियाला मिळाली. 

३० महिन्यांपासून टीम इंडियासोबत; पण प्रत्येक वेळी बाकावरच! त्याला कोच गंभीर यांनी दिलाय शब्द

ड्रेसिंग रूममधील मिटींगमध्ये झाली चर्चा

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याधी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार शुबमन गिल, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्यासह अन्य स्टाफ सदस्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी एका सदस्याने प्रसिद्ध कृष्णानं षटक पूर्ण केल्यावर फिरकी गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवून स्लो ओव्हर रेटच्या कारवाईपासून वाचता येईल, असा सल्ला दिला. 

गंभीर राहिला खंबीर, अन् टीम इंडियानं मारली बाजी

ओव्हर रेट सुधारण्यासाठी फिरकीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण हा डाव खेळला असता तर जेमी स्मिथ आणि ओव्हरटन मॅच संपवून मोकळे झाले असते. ही गोष्ट डोक्यात ठेवून गौतम गंभीरनं ICC नं दिलेल्या वॉर्निंगनंतरही आपल्या रनणितीवर ठाम राहण्याचा खंबीर निर्णय घेतला. स्लो रेट सुधारण्यापेक्षा मॅच जिंकण्यावर फोकस करण्यासाठी एका बाजूनं प्रसिद्ध कृष्णा आणि दुसऱ्या बाजूनं मोहम्मद सिराजच आक्रमण करेल, हे ठरलं. गिलनंही त्याला सहमती दिली अन् गंभीरचा हा डाव मॅचला कलाटणी देणारा ठरला.  

Web Title: ICC Warned India Of Heavy Punishment Over This Act In 5th Test vs England Report But Gautam Gambhir Said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.