Join us

ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप

Jasprit Bumrah Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings : 'मॅचविनर' बुमराहने पहिल्या कसोटीत घेतले ८ बळी; यशस्वी, विराटची दमदार शतके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:52 IST

Open in App

Jasprit Bumrah Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings : टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्याच कसोटी पराभूत केले. पर्थवर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. ५३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना, भारताने यजमानांवर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह. त्याने पहिल्या डावात ३० धावांत ५ बळी तर दुसऱ्या डावात ४२ धावांत ३ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. कर्णधारापदाला साजेशा खेळीची जसप्रीत बुमराहला लगेच पावतीही मिळाली. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC कसोटी क्रमवारीत बुमराह पुन्हा नंबर १ ठरला. तसेच दीडशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालनेदेखील क्रमवारीत मोठी झेप घेतली.

जसप्रीत बुमराह पुन्हा अव्वल

पहिला कसोटी सामना सुरु होण्याआधी जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी होता. मात्र भारताच्या ऐतिहासिक विजयासह बुमराहने जोश हेजलवूड आणि कगिसो रबाडा दोघांना मागे टाक अव्वलस्थान पटकावले. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ८८३ रेटिंग पॉइंट्ससह त्याने पहिला क्रमांक मिळवला. यंदाच्या वर्षात फेब्रुवारी आणि ऑक्टोबर नंतर तिसऱ्यांदा बुमराहने अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. याशिवाय TOP 10 मध्ये भारताचा केवळ फिरकीपटू रवी अश्विन (९०४) चौथ्या आणि रवींद्र जाडेजा (८९९) सातव्या स्थानी आहेत.

यशस्वी, विराटची मोठी झेप

पर्थ टेस्टमधील दोन्ही शतकवीरांनीही कसोटी क्रमवारीत मोठी दमदार प्रगती केली. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने १६१ धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. त्याला २ स्थानांची बढती मिळून तो आता ८२५ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तसेच महान फलंदाज विराट कोहली यानेही नाबाद १०० धावांची खेळी करत ९ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता ६८९ धावांच्या गुणांसह १३व्या स्थानी आला आहे. टीम इंडियाकडून TOP 10 मध्ये केवळ रिषभ पंत ७३६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत फारसा बदल झालेला नाही. भारताचा रविंद्र जाडेजा अव्वल, रविचंद्रन अश्विन दुसऱ्या तर अक्षर पटेल एका स्थानाच्या बढतीसह सातव्या स्थानी विराजमान आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहविराट कोहलीयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाआयसीसी