ICC T20I Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या टी-२० क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. फलंदाजी क्रमवारीत भारताचा स्फोटक बॅटर अभिषेक शर्मा याने जवळपास १५ अबाधित असलेला विक्रम मोडीत काढत सर्वोच्च ऑल टाइम रेटिंगचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. दुसऱ्या बाजूला आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या पाकच्या सईम अयूबनं आश्चर्यकारकरित्या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे. त्याच्यामुळे हार्दिक पांड्याला फटका बसला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅटिंगमध्ये फुसका बार ठरलेला पाकचा गडी T20I All Rounder च्या यादीत टॉपर
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वलस्थानी होता. पण आशिया चषक स्पर्धेतील गोलंदाजीच्या जोरावर सईम अयूबनं त्याच्या जागेवर कब्जा केला आहे. सईम अयूब हा यंदाच्या आशिया कप स्पर्धेत ७ डावात ४ वेळा शून्यावर बाद झाला. यात एकदा हार्दिक पांड्यासमोरच तो झिरो ठरलेला. पण गोलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर त्याने पांड्याला मागे टाकून नंबर वन होण्याचा डाव साधला आहे.
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
बॅटिंगमध्ये फ्लॉप शो, पण...
आशिया कप स्पर्धेत फलंदाजीत फ्लॉप शो देणाऱ्या सईम अयूब याने ७ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याने ४८ धावा आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या. दुखापतीमुळे तो फायनललाही मुकला. त्याचा फायदा पाकिस्तानच्या सईम अयूबला झाला असून क्रमवारीत चार स्थानांच्या सुधारणेसह तो पहिल्यांदाच अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्याच्या खात्यात २४१ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.
पांड्यासाठी पुन्हा टॉपर होणं फार अवघड नाही, कारण..
हार्दिक पांड्याला फक्त एका स्थानाचा फटका बसला आहे. त्याच्या खात्यात २३३ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. पाकचा अयूब आणि पांड्या यांच्यात फक्त ८ पॉइंट्सचं अंतर आहे. त्यामुळे पुन्हा कमबॅक करण्यासाठी पांड्याला एक मालिका पुरेसी ठरेल. ऑल राउंडरच्या यादीत मोहम्म नबीही २३१ रेटिंग पॉइंट्स सह तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसते.