ICC T20 World Cup Today Matches India Face Namibia 18th Match Live Streaming Full Details : श्रीलंकेतील पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवरील श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यातील लढतीनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सहाव्या दिवसांतील ट्रिपल हेडर लढतींची सुरुवात होणार आहे. दुपारच्या सत्रात मुंबईतील वानखेडे स्टेडियवर नेपाळ आणि इटली हे दोन संघ एकमेकांना भिडणार असून तिसऱ्या सामन्यात तगड्या भारतीय संघासमोर नवख्या नामिबियाचे आव्हान असेल. इथं एक नजर टाकुयात हे सामने कधी आणि कुठं रंगणार? क्रिकेट चाहत्यांना या सामने कसे पाहता येतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओमानसाठी ऐतिहासिक सामना
ओमान क्रिकेट संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना हा ऐतिहासिक असेल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ते श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना केल्यावर श्रीलंकेविरुद्ध त्यांचा तग लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. या सामन्याआधी श्रीलंकेच्या संघाला वानिंदू हसरंगाच्या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. मॅच विनर गोलंदाज स्पर्धेतून आउट झाल्यावर श्रीलंकन संघ आपला विजय सिलसिला कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
सचिनला क्लीन बोल्ड करणारा नामिबियाचा 'डॉक्टर' क्रिकेटर... रुडी वुरेन बद्दलच्या खास गोष्टी
- श्रीलंका विरुद्ध ओमान (टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १६ वा सामना)
- सामन्याचे ठिकाण- पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम
- सामन्याची वेळ- सकाळी ११ वाजता
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर दिसणार नेपाळचा जलवा
रोहित कुमार पौडेलच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या संघाने इंग्लंडविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली. फक्त ४ धावांनी ते विजयापासून दूर राहिले. आपल्या खेळीनं नेपाळच्या संघाने सर्वच क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले असून इटली विरुद्ध ते पहिल्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.
- नेपाळ विरुद्ध इटली (टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वा सामना)
- सामन्याचे ठिकाण- वानखेडे स्टेडियम, मुंबई
- सामन्याची वेळ- दुपारी ३ वाजता
दिल्लीच्या मैदानात टीम इंडिया धावांची 'बरसात' करणार?
भारतीय संघ दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळेल. पहिल्या सामन्याला मुकलेला जसप्रीत बुमराह या सामन्यात कमबॅक करेल. सलामीवीर अभिषेक शर्माची तब्येतीची समस्या असल्यामुळे ईशान किशनच्या साथीनं संजू सॅमसन भारताच्या डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या लढती भारतीय फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळाले होते. दिल्लीच्या मैदानात बॅटिंगमधील रुबाब दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.
- भारत विरुद्ध नामिबिया (टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १८ वा सामना)
- सामन्याचे ठिकाण- अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
- सामन्याची वेळ- सायंकाळी ७ वाजता
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने कुठे आणि कसे पाहता येतील?
भारत आणि नामिबियासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध ओमान आणि नेपाळ विरुद्ध इटली यांच्यातील सामन्यांचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येईल. जिओ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता येईल.