T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी

भारतीय संघाची फलंदाजी गडबडली, पण त्यानंतर विजयाची हमी देणारी गोलंदाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 23:01 IST2026-02-07T23:00:11+5:302026-02-07T23:01:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Suryakumar Yadav, Mohammed Siraj Shine As India Beat USA By 29 Runs | T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी

T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी

ICC T20 World Cup 2026 India vs United States of America, 3rd Match : सूर्यकुमार यादवच्या धमाकेदार खेळीनंतर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी गोलंदाजीच्या जोरावर USA वर पलटवार केला.  मुंबईतील वानखेडेच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने सूर्याच्या खेळीच्या जोरावर १६१ धावा करत USA समोर १६२ धावांचे टार्गेट सेट केले होते. भारताने पॉवरप्लेमध्ये धारदार गोलंदाजी करत फलंदाजीतील उणीव भरून काढली. मोक्याच्या क्षणी अक्षर पटेलनं महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. USA संघाला ८ बाद १३२ धावांवर रोखत भारतीय संघाने पहिला सामना २९ धावांनी जिंकला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टीम इंडियाच्या  धुरंधरांचा फलंदाजी वेळी फ्लॉप शो, सूर्या एकटा पुरून उरला

मुंबईतील वानखेडेचं मैदान फलंदाजांसाठी नंदवन मानले जाते. त्यामुळे सलामीच्या सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी मिळाली तर ३०० पारचा अशक्यप्राय आकडाही  गाठू शकेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. पण अमेरिकन गोलंदाजांनी ही चर्चा फोल ठरवली. अचूक टप्पा आणि चेंडूवरील उत्तम नियंत्रण ठेवत त्यांनी भारताच्या धुरंधरांना स्वस्तात माघारी धाडले. संघ अडचणीत असताना सूर्यकुमार मैदानात तग धरून थांबला. त्याने अमेरिकेच्या गोलंदाजीत सर्वात महागडा ठरलेल्या सौरभ नेत्रावळकरला टार्गेट केले. त्याचा हा प्लॅन यशस्वी ठरला अन् सूर्याच्या ४९ चेंडूतील ८४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात १६१ धावांपर्यंत मजल मारली होती.

गोलंदाजीत सिराज, अर्शदीपनंतर पिक्चरमध्ये आला अक्षर पटेल अन्...

आघाडीच्या तिघे स्वस्तात माघारी फिरल्यावर मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती या भारतीय वंशाच्या USA च्या ताफ्यातील खेळाडूंनी मैदानात तगड धरला. जोडी धोकादायक ठरतीये, असे चित्र निर्माण झाल्यावर वरूण चक्रवर्तीनं मिलिंद कुमारला ३४ धावांवर चालते केले. अक्षर पटेलनं संजयला ३७ धावांवर बाद केले अन् भारतीय संघ सामन्यात आला. या दोघांशिवाय शुभमन रांजणे याने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ तर वरुण चक्रवर्तीनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. 

Web Title : सूर्यकुमार यादव की शानदार पारी, टी20 विश्व कप में भारत ने यूएसए को हराया।

Web Summary : सूर्यकुमार यादव की दमदार पारी और अनुशासित गेंदबाजी के चलते भारत ने यूएसए को हराया। सिराज, पटेल और अर्शदीप के गेंदबाजी आक्रमण ने यूएसए को रोका, जिससे भारत के टी20 विश्व कप अभियान की विजयी शुरुआत हुई। भारत ने 162 का लक्ष्य रखा और अंततः 29 रनों से जीत हासिल की।

Web Title : Suryakumar Yadav shines as India defeats USA in T20 World Cup.

Web Summary : Suryakumar Yadav's powerful innings and disciplined bowling led India to victory against the USA. Siraj, Patel, and Arshdeep's bowling attack restricted USA, securing a winning start to India's T20 World Cup campaign. India set a target of 162, ultimately winning by 29 runs.