T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या Gulbadin Naib ची पॉवर! फिफ्टी मारल्यावर झाला 'बॉडीबिल्डर'

गुलबदीनचा पॉवर शो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:19 IST2026-02-08T13:17:48+5:302026-02-08T13:19:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 NZ vs AFG Fourth T20I Fifty For Gulbadin Naib He Also Brings Up 1,000 T20I Runs For Afghanistan Fine Knock Against New Zealand Quality Bowling Lineup | T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या Gulbadin Naib ची पॉवर! फिफ्टी मारल्यावर झाला 'बॉडीबिल्डर'

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या Gulbadin Naib ची पॉवर! फिफ्टी मारल्यावर झाला 'बॉडीबिल्डर'

ICC T20 World Cup 2026 NZ vs AFG Fourth T20I Fifty For Gulbadin Naib : चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील डेथ ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध  अफगाणिस्तान यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. पण संघाने ४४ धावांवर संघाने पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गुलबदीन नायबीचा पॉवर शो पाहायला मिळाला. सेदीकुल्ला अटलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी त्याने ५१ चेंडूत ७९ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावला. टी-२० कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकवताना त्याने या सामन्यात १००० धावांचा पल्लाही गाठला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

गुलबदीनचा पॉवर शो! चौथी फिफ्टी अन् 'बॉ़डीबिल्डिंग' स्टाईल सेलिब्रेशन 

अफगाणिस्तानच्या डावातील १५ व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारून गुलबदीन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने २९ चेंडूत टी-२० कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले.  पहिल्या १६ चेंडूत फक्त १८ धावा करणाऱ्या गुलबदीन याने पुढच्या ११ चेंडूत ३२ धावा कुटल्या. अर्धशतकानंतर त्याने 'बॉडीबिल्डिंग' स्टाईल सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. स्टेडियमवर उपस्थितीत अफगाणिस्तानच्या चाहत्यांनीही त्याच अंदाजात त्याच्या या खेळीला दाद दिली. गुलबदीन हा बॅटिंग बॉलिंगमधील दमदार कामगिरीनंतर नेहमीच आपले 'डोले-शोले' दाखवत सेलिब्रेशन करत असतो.

Suryakumar Yadav : भारताच्या वाघाची USA विरुद्ध डरकाळी! बाबरचा विक्रम मोडत PAK ची जिरवली

सर्वोच्च धावसंख्या अन् १००० धावांचा पल्ला

गुलबदीन याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ३५ चेंडूत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धमाकेदार खेळी केली. ही टी-२० कारकिर्दीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्लाही गाठला. ८२ व्या डावात त्याने हा डाव साधला आहे. हा पल्ला गाठणारा अफगाणिस्तानचा तो नववा फलंदाज आहे. या यादीत मोहम्मद नबी (२४४० धावा), रहमनुल्लाह गुरबाझ (२१६६ धावा) आणि मोहम्मद शहझादा (२०४८ धावा) आघाडीच्या टॉप ३ मध्ये आहेत.

अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला दिले तगडे चॅलेंज

गुलबदीनच्या खेळीच्या जोरावर अफगामिस्तानच्या संघाने सलामीच्या लढतीत न्यूझींडसमोर निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा करत तडगे टार्गेट सेटे केले. न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत कधीही एवढ्या धावांचा पाठलाग केलेला नाही. त्यामुळे डेथ ग्रुपमधील पहिल्या लढतीत अफगाणिस्तान पॉवर दाखवण्याचे चित्र पहिल्या डावानंतरच निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
 

Web Title : टी20 विश्व कप: गुलबदीन नायब का अर्धशतक और 'बॉडीबिल्डर' अंदाज!

Web Summary : टी20 विश्व कप में गुलबदीन नायब के दमदार अर्धशतक और 'बॉडीबिल्डर' अंदाज ने अफगानिस्तान को न्यूजीलैंड के खिलाफ मजबूत स्थिति में पहुंचाया। नायब की 63 रनों की पारी की बदौलत अफगानिस्तान ने 182 रनों का चुनौतीपूर्ण स्कोर खड़ा किया। उन्होंने 1000 टी20 रन भी पूरे किए।

Web Title : T20 WC: Gulbadin Naib's Fifty & 'Bodybuilder' Celebration Powers Afghanistan!

Web Summary : Gulbadin Naib's powerful fifty and 'bodybuilder' celebration propelled Afghanistan against New Zealand in the T20 World Cup. His innings of 63, including four sixes, helped Afghanistan reach a challenging total of 182. He also completed 1000 T20 runs.