मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर

संजूला आणखी  एक संधी मिळणार का? टीम इंडियातून कुणाचा पत्ता होणार कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:39 IST2026-02-23T14:37:11+5:302026-02-23T14:39:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 India Coach Hints Sanju Samson Inclusion Team India Playing 11 After Heavy Defeat To South Africa Super 8 Match | मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर

मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर

India Coach Hints Sanju Samson Inclusion Team India Playing 11 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेलल्या सुपर ८ फेरीतील पहिल्याच लढतीत भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७६ धावांनी सामना जिंकत सेमी फायनलच्या दिशेनं एक मजबूत पाऊल पुढे टाकले.  दुसरीकडे टीम इंडिया स्पर्धेत टिकणार का? असा प्रश्न निर्माण झाला  आहे.  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवानंतर उर्वरित 'करो वा मरो' अशा लढतीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होतील, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त एका सामन्यात संधी मिळालेल्या संजूला पुन्हा संधी मिळेल, याचे संकेत खुद्द टीम इंडियाच्या ताफ्यातील प्रशिक्षकांनीच दिले आहेत.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

संजूला आणखी  एक संधी मिळणार का? प्रशिक्षकांनी असं दिल उत्तर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेशकाटे (Ryan ten Doeschate) यांना आगामी सामन्यात संघात बदल होईल का? संजू सॅमसनसाठी पुन्हा प्लेइंग इलेव्हनची संधी मिळेल का? या धाटणीतील प्रश्न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की,  संजू सॅमसन  नक्कीच चर्चेत राहिल. सहायक्क प्रशिक्षक म्हणाले की, " मागील १८ महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा नक्कीच विचार केला जाईल. सध्याच्या घडीला संजू सॅमसनधावांसाठी संघर्ष करताना दिसले असले तरी तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. टॉप ऑर्डरमध्ये राईट-हँडर असल्यामुळे टॅक्टिकल फायदा होतो. त्यामुळे त्याचे नाव उर्वरित दोन महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान नक्की चर्चेचा विषय राहणार आहे."

"बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!" भारताच्या पराभवानंतर 'खदखदून' हसला मोहम्मद आमिर!

टीम इंडियातून कुणाचा पत्ता होणार कट?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांच्यासमोर अनेक संघ पार्ट टाईम ऑफ स्पिनरचा वापर करत आहेत. डावखुऱ्यांचा भरणा असलेली टीम इंडिया फिरकीसमोर दबावात दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी  सलामीला राइट-लेफ्ट कॉम्बिनेशन एक उत्तम पर्याय ठरू शकते. हा डाव खेळण्यासाठी संजूच्या रुपात एक चांगला फलंदाज संघात आहे. आता त्याच्यासाठी सातत्याने  फ्लॉप ठरलेल्या अभिषेक शर्माचा पत्ता कट होणार की, तिलक वर्माच्या जागी त्याला संधी मिळणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Web Title : हार के बाद टीम इंडिया में बदलाव के संकेत; संजू सैमसन को मिल सकता है मौका।

Web Summary : हार के बाद, टीम इंडिया आगामी मैचों के लिए बदलाव पर विचार कर रही है। कोच ने संजू सैमसन को बल्लेबाजी क्रम को मजबूत करने और स्पिन के खिलाफ संघर्ष को दूर करने के लिए प्लेइंग इलेवन में शामिल करने का संकेत दिया है। अभिषेक शर्मा या तिलक वर्मा को बदला जा सकता है।

Web Title : Team India faces changes after defeat; Sanju Samson inclusion hinted.

Web Summary : Following a major defeat, Team India considers changes for upcoming matches. Coach hints at including Sanju Samson in the playing eleven to strengthen the batting lineup and address struggles against spin. Abhishek Sharma or Tilak Verma may be replaced.