ICC T20 World Cup 2026 Suryakumar Yadav And Rohit Sharma Viral Video : सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा ही जोडी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. या दोघांमधील कमालीची बॉन्डिंग नेहमीच चर्चेचा विषय ठरते. भारतीय संघाने अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात केली. या लढतीसाठी हिटमॅन रोहित शर्माही वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. गत हंगामात भारताला चॅम्पियन केल्यानंतर रोहित शर्मानं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ICC ने यंदाच्या हंगामासाठी रोहित शर्माची ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे. वानखेडेच्या मैदानावर सामन्यापूर्वी, नाणेफेकीआधी सूर्यानं धावत येत हिटमॅन रोहितची भेट घेतली. एवढंच नव्हे, तर त्याच्याकडून सल्लाही विचारला. हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजूनही हिटमॅन रोहितच कॅप्टन! सूर्यासोबतचा व्हायरल व्हिडिओ त्याचा पुरावा
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यातील नाणेफेकीसाठी सज्ज असल्याचे दिसते. त्याच वेळी त्याला रोहित शर्मा मैदानातून जाताना दिसते. सूर्या लगेच धावत जाऊन त्याला भेटतो. एवढेच नाही तर नाणेफेक जिंकल्यावर पहिली फलंदाजी घेऊ की गोलंदाजी? असा प्रश्नही हिटमॅनला विचारतो. त्यावर रोहितनं "वेडा आहेस का? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घे" असा सल्ला दिल्याचे दिसते. रोहितचा वारसा जपण्यासाठी सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत असला तरी त्याच्या मनात अजूनही रोहित शर्माच कॅप्टन आहे, असे चित्र या व्हिडिओतून दिसून येते. याआधी ICC अध्यक्ष जय शहा यांनीही रोहितच कॅप्टन आहे, असे वक्तव्य केले होते.
T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या Gulbadin Naib ची पॉवर! फिफ्टी मारल्यावर झाला 'बॉडीबिल्डर'
रोहितनंतर सूर्याचं पर्व! पहिल्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
अमेरिकेविरुद्धच्या सामन्या आधी रोहित शर्मानं जो सल्ला दिला तो आजमावण्याची संधीच सूर्याला मिळाली नाही. कारण भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल गमावला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ अडचणीत सापडल्याचेही दिसून आले. पण सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीच्या जोरावर कमबॅक करत टीम इंडियाने या सामन्यात विजयी सलामी दिली. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग आठ विजयानंतर यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत सलग ९ विजय मिळवन नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. रोहितनंतर सूर्यकुमार यादवनं द्विपक्षीय टी-२० मालिकेत आपल्या नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध केले आहे. आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो हाच दबदबा कायम ठेवत टीम इंडियाला ऐतिहासिक जेतेपद मिळवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : A viral video shows Suryakumar Yadav seeking advice from Rohit Sharma before a match, sparking discussions about leadership. Despite Yadav leading, the interaction suggests Sharma's continued influence. India secured a record-breaking ninth consecutive T20 World Cup win.
Web Summary : एक वायरल वीडियो में सूर्यकुमार यादव मैच से पहले रोहित शर्मा से सलाह लेते हुए दिखाई दे रहे हैं, जिससे नेतृत्व को लेकर चर्चा छिड़ गई है। यादव के नेतृत्व करने के बावजूद, यह बातचीत शर्मा के निरंतर प्रभाव का सुझाव देती है। भारत ने लगातार नौवीं टी20 विश्व कप जीत हासिल की।