ICC T20 Word Cup 2026 Team India Super 8 Schedule Date Time And venue : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या हंगामातील स्पर्धेतील सुपर ८ च समीकरण हळूहळू स्पष्ट होत आहे. वेस्ट इंडिज आणि भारतीय संघानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानंही सुपर ८ मधील स्थान निश्चित केले आहे. अधिकृतरित्या दक्षिण आफ्रिकेनं पुढच्या फेरीत प्रवेश करताच भारतीय संघाची सुपर ८ मधील पहिल्या लढतीचं चित्रही स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढतीनं सुपर ८ च्या फेरीची सुरुवात करणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठं आणि कधी रंगणार भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ मधील सामना?
२१ फेब्रुवारीपासून सुपर ८ च्या लढतींना सुरुवात होत असून २२ फेब्रुवारीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्याची सुरुवात होईल. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाने घरच्या मैदानात न्यूझीलंडसह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले होते. हाच सिलसिला सुपर ८ मध्ये पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
IND vs PAK: पराभव दिसताच पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवींचे पलायन; शेवटचा चेंडू पहायला देखील थांबले नाहीत
भारतीय संघाचे सुपर ८ मधील अन्य दोन सामन्यांचे वेळापत्रक?
२६ फेब्रुवारीला भारतीय संघ सुपर ८ मधील दुसरा सामना कोलकाताच्या मैदानात खेळणार असून हा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणारार ते अद्याप निश्चित नाही. त्यानंतर भारतीय संघ या फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळमार आहे. ही लढत कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Web Summary : India starts Super 8 against South Africa, February 22, Ahmedabad. Other matches in Kolkata and against West Indies. Series hopes high.
Web Summary : भारत सुपर 8 में 22 फरवरी को अहमदाबाद में दक्षिण अफ्रीका से खेलेगा। अन्य मैच कोलकाता में और वेस्ट इंडीज के खिलाफ। सीरीज की उम्मीदें ऊंची।