ICC Referee BCCI Allegations: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) माजी सामनाधिकारी (Match Referee) ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि ICC च्या निर्णय प्रक्रियेवर मोठा आरोप केला आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे वडील असलेल्या ख्रिस ब्रॉड यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सौरव गांगुली कर्णधार असलेल्या एका सामन्यात भारतीय संघाकडून एक चूक घडली होती. नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं, पण त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी माझ्यावर 'राजकीय दबाव' आणण्यात आला होता. या आरोपामुळे क्रिकेटजगतात खळबळ उडाली आहे. (Sourav Ganguly Slow Over Rate Fine ICC Match Referee Pressure)
एका फोन निर्णय बदलावा लागला...
ख्रिस ब्रॉड यांनी दावा केला की, जेव्हा गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा तीन ते चार षटके कमी टाकली, तेव्हा नियमानुसार दंड लावणे अनिवार्य होते. मात्र, त्यांना थेट बीसीसीआयमधून एक फोन आला, ज्यात 'कठोर निर्णय न घेता प्रकरण नरमाईने हाताळा' आणि भारतीय संघाला दंडापासून वाचवा असे थेट निर्देश देण्यात आले. ब्रॉड यांच्या म्हणण्यानुसार, या दबावामुळे त्यांना वेळेच्या गणितात फेरफार करून ओव्हर-रेटला दंडाच्या मर्यादेखाली आणावे लागले. (BCCI Influence in ICC)
आयसीसीमधील उच्च पदांवरील अधिकारी वर्ग हल्ली खूपच 'राजकीय' पद्धतीने (BCCI Political Influence ICC) वागतात, असे मत ब्रॉड यांनी व्यक्त केले. "भारताकडे सर्व काही आहे, पैसा आहे आणि त्यांनी आता तर आयसीसीवर कब्जा केला आहे. सध्याच्या क्रिकेट प्रशासनाबाबत मला शंकाच येते. सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये राजकारण सुरू होते. पण आजकाल परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. मी सध्या या निर्णयप्रक्रियेचा भाग नाही याचा मला आनंद आहे," असे ख्रिस ब्रॉड यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली आहे.