आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नव्याने जाहीर केलेल्या महिला क्रिकेटमधील टी-२० क्रमवारीत भारतीय संघाची ऑलराउंडर दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवणारी दीप्तीची बॉलिंग रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज ॲनाबेल सदरलँड हिने पुन्हा एकदा अव्वलस्थानी कब्जा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नंबर वन ॲनाबेल आणि दीप्ती यांच्यात फक्त एका रेटिंग पाँट्सचा फरक
ऑस्ट्रेलियन ॲनाबेल सदरलँड ७३६ रेटिंग पॉइंट्स मिळवत महिला टी-२० क्रमवारीतील बॉलिंग क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचली आहे. त्यापाठोपाठ दीप्ती शर्मा ७३५ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर दिसते. पाकिस्तानची सादिया इक्बाल (७३२ रेटिंग), इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन (७२७ रेटिंग) आणि लॉरेन बेल (७१४) या अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
"माझ्या कोणत्याही फोटोचा वापर..." भारतीय महिला क्रिकेटरच्या पोस्टसह त्यावरील रिप्लाय चर्चेत
कर्णधार हरमनप्रीत कौर फायद्यात, रेणुकासह राधाला फटका
ताज्या रँकिंगमध्ये भारताच्या रेणुका सिंग ठाकूरला पाच स्थानांचा फटका बसला असून ती ६९८ रेटिंगसह ११व्या स्थानावर घसरली आहे. याशिवाय राधा यादवलाही दोन स्थानांचं नुकसान झाले असून ती १८ व्या क्रमांकावर आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरनं श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. या खेळीचा तिला चांगला फायदा झाला असून दोन स्थानांच्या सुधारणेसह भारतीय कर्णधार बॅटरच्या क्रमवारीत १३ व्या स्थानी पोहचली आहे.
ICC महिला T20I ऑलराउंडर्स रँकिंग
महिला टी-२० मध्ये ऑलराउंडरच्या क्रमवारीत हेले मॅथ्यूज ५०५ रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर ४३४ रेटिंगसह दुसऱ्या तर दीप्ती शर्मा ३८२ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अरुंधती रेड्डीने नाबाद २७ धावांच्या खेळीसह एक विकेट घेतली होती. या कामगिरीमुळे ती २१ स्थानांनी मोठी झेप घेत ४४ व्या क्रमांकावर पोहचली आहे.
महिला टी-२० बॅटिंगमधील टॉप ६मधील रँकिंग जैसे थे
महिला टी-२० क्रमवारीत बॅटरच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियन बेथ मूनी ७९४ रेटिंगसह अव्वलस्थानी असून वेस्ट इंडिजच्या हेली मेथ्यूज (७७४ रेटिंग) पाठोपाठ स्मृती मानधना (७५९ ) तिसऱ्या स्थानी आहे. आघाडीच्या १० मध्ये स्मृतीसह शेफाली वर्माचाही नंबलागतो. ती ७३२रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे.