प्रिन्स शुबमन गिलला नंबर वन 'ताज' मिळवण्याची संधी; बाबरची वनडेतील 'बादशाहत' धोक्यात!

शुबमन गिलनं नंबर वनच्या दिशेनं भक्कम पावले टाकली ही, आता बाबर आझमसमोर असेल आपलंं स्थान टिकवण्याचं मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:33 IST2025-02-12T15:30:55+5:302025-02-12T15:33:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI Rankings Shubman Gill Closes Babar Azam In On Number One Position Rohit Sharma And Virat Kohli Have Dropped | प्रिन्स शुबमन गिलला नंबर वन 'ताज' मिळवण्याची संधी; बाबरची वनडेतील 'बादशाहत' धोक्यात!

प्रिन्स शुबमन गिलला नंबर वन 'ताज' मिळवण्याची संधी; बाबरची वनडेतील 'बादशाहत' धोक्यात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एका बाजूला भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सुरु असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीची घोषणा केलीये. भारतीय संघातील प्रिन्स शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम ७८६ रेटिंग पॉइंट्ससह अव्वलस्थानावर आहे. आयसीसीचॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शुबमन गिलला पाकिस्तानी स्टार बॅटरचा करेक्ट कार्यक्रम करत वनडेतील नंबर वन होण्याची संधी आहे. कारण शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर असला तरी बाबरपेक्षा तो अवघ्या काही रेटिंग पॉइंट्ससह मागे आहे. शुबमन गिलच्या खात्यात ७८१ रेटिंग पॉइंट्स आहेत. इंग्लंड विरुद्धच्या अहमदाबादच्या मैदानात शुबमन गिलनं कडक खेळी करून दाखवली आहे. त्यामुळे ऑयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच तो नंबर वनवर विराजमान झाल्याचे पाहायला मिळू शकते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शतकानंतरही रोहित शर्मा घाट्यात! 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं कटकच्या मैदानात दमदार शतक झळकावले होते. या शतकी खेळीनंतरही रोहित शर्माला एका क्रमांकांनी घाटा झालाय. तो ७७३ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मानं कटकच्या मैदानात ९० चेंडूत ११९ धावांची दमदार खेळी केली होती. या सामन्यात गिलसोबत त्याने १३६ धावांची भागीदारी केल्याचे पाहायला मिळाले होते.  

विराट टॉप ५ मधून 'आउट', अय्यरची टॉप १० मध्ये एन्ट्री

आयसीसीच्या फलंदाजांच्या नव्या एकदिवयी क्रमवारीत विराट कोहलीची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो ७२८ गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. याआधी तो टॉप ५ मध्ये होता. श्रेयस अय्यरनं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून दमदार कमबॅक केले होते. पहिल्या सामन्यात कडक फिफ्टीसह दुसऱ्या सामन्यातही त्याच्या भात्यातून चांगली खेळी पाहायला मिळाली होती. या खेळीचा त्याला एका स्थानांनी फायदा झाला असून त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टॉप १० मध्ये एन्ट्री मारली आहे. 
 

वनडेतील नंबर वन स्थान टिकवण्याचं बाबरसमोर मोठं आव्हान

आयसीसीकडून आठवड्याला क्रमवार जारी केली जाते. पुढच्या आठवड्यात १९ फेब्रुवारीला पुन्हा नवी रँकिंग पाहायला मिळाले. ज्या दिवशी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा शुभारंभ होईल त्या दिवशी शुबमन गिल नंबर वन झाल्याचेही पाहायला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला बाबर आझमला नंबर वन स्थान टिकवून ठेण्याचे तगडे आव्हान असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानचा संघ तिरंगी मालिकेअंतर्गत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळाला तर ते फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसली. इंग्लंड विरुद्ध शुबमन गिलच्या भात्यातून मोठी खेळी आल्यामुळे बाबरचं नंबर वन स्थान धोक्यात आहे. त्यात जर बाबर तिरंगी मालिकेत अपयशी ठरला तर गिल नंबर वनचा मार्ग सहज मोकळा होईल.
 

Web Title: ICC ODI Rankings Shubman Gill Closes Babar Azam In On Number One Position Rohit Sharma And Virat Kohli Have Dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.