ICC Hall of Fame म्हणजे काय? याआधी FICA फेमसह व्हायचा दिग्गजांचा सन्मान, पण आता...

What ICC Hall of Fame Means: ICC हॉल ऑफ फेम म्हणजे काय? कधी झाली याची सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:06 IST2025-06-10T13:17:31+5:302025-06-10T14:06:04+5:30

whatsapp join usJoin us
ICC Hall Of Fame What is the criteria and who have been inducted MS Dhoni And Other 6 Legendary Players To Be Honoured In New List | ICC Hall of Fame म्हणजे काय? याआधी FICA फेमसह व्हायचा दिग्गजांचा सन्मान, पण आता...

ICC Hall of Fame म्हणजे काय? याआधी FICA फेमसह व्हायचा दिग्गजांचा सन्मान, पण आता...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) लंडनमधील एका खास समारंभात ICC हॉल ऑफ फेममध्ये नव्या सात प्रतिष्ठित खेळाडूंची यादी जाहीर केली. भारताच्या महेंद्रसिंह धोनीसह यावर्षी हाशिम आमला, मॅथ्यू हेडन, ग्रॅमी स्मिथ आणि डॅनियल व्हेटोरी या पाच पुरुष खेळाडूंसह महिला गटातून पाकिस्तानची क्रिकेटर सना मीर आणि इंग्लंडची सारा टेलर यांच्या नावाचा या यादीत  समावेश करण्यात आला आहे. या नव्या ७ चेहऱ्यांसह ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या खेळाडूंची संख्या आता १२२ वर पोहचली आहे. इथं जाणून घेऊयात या सन्मानासंदर्भाती सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ICC Hall of Fame म्हणजे काय? कधी झाली याची सुरुवात?

'आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम' हा क्रिकेटमधील सर्वात मोठा सन्मान आहे. क्रिकेट जगतात खास छाप सोडणाऱ्या खेळाडूंचा या यादीत समावेश केला जातो.   २ जानेवारी २००९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) यांच्यावतीने क्रिकेटच्या मैदानात अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात येते.   १९९९ ते २००३ दरम्यान FICA च्या हॉल ऑफ फेममध्ये ५५ क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला होता. २००९ मध्ये, ICC ने पाच नवीन क्रिकेटपटूंसह सर्व ५५ खेळाडूंचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला.  २००९ ते २०५ या कालावधीत १२२ खेळाडू ICC ऑफ फेममध्ये समवाविष्ट झाले आहेत. 

MS धोनीसह ICC Hall Of Fame मधील ११ भारतीयांमध्ये २ महिला क्रिकेटर्सचाही समावेश

या सन्मानासाठी कोणता खेळाडू ठरतो पात्र?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पाच वर्षांनी ICC हॉल ऑफ फेममध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी क्रिकेटरचा विचार केला जातो. कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात २० शतकांसह ८००० पेक्षा अधिक धावा किंवा ५० पेक्षा अधिक सरासरीसह धावा करणाऱ्या फलंदाजाचा या सन्मानासाठी विचार केला जातो. गोलंदाजासाठी २०० विकेट्स आणि कसोटीतील स्ट्राइक रेट ५० पेक्षा कमी आणि वनडेत ३० पेक्षा कमी स्ट्राइक रेट असणे गरजेचे आहे. विकेटमागे स्टंपिंग आणि कॅचसह २०० बळी ज्याच्या नावे आहेत तो विकेटकिपरही या सन्मानासाठी पात्र ठरतो. २५ कसोटी सामने किंवा १०० एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा खेळाडू  कॅप्टन्सीच्या गटातून या सन्मानासाठी पात्र ठरू शकतो. 



अंपायरसह प्रशासकाचाही केला जाऊ शकतो सन्मान

'ICC हॉल ऑफ फेम' साठी पात्रता निकष ठरलेले असले तरी क्रिकेटच्या मैदानातील अविश्वसनीय कामगिरीसाठी संबंधित पात्रता पार केली नसली तरी काही खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय मैदानातील पंच आणि प्रशासकीय विभागातील मंडळींनाही क्रिकेटमधील योगदानासाठी सन्मानित केले जाऊ शकते. 

 

Web Title: ICC Hall Of Fame What is the criteria and who have been inducted MS Dhoni And Other 6 Legendary Players To Be Honoured In New List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.