IND vs PAK : पाकचा डाव फसला! टीम इंडिया विरुद्ध भिडायला जो 'मोहरा' निवडला तो मॅच आधीच 'आउट'

तो आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:03 IST2025-02-22T16:03:02+5:302025-02-22T16:03:25+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025 Fakhar Zaman ruled out Imam Ul Haq Replace Him See ODI Record And Stats | IND vs PAK : पाकचा डाव फसला! टीम इंडिया विरुद्ध भिडायला जो 'मोहरा' निवडला तो मॅच आधीच 'आउट'

IND vs PAK : पाकचा डाव फसला! टीम इंडिया विरुद्ध भिडायला जो 'मोहरा' निवडला तो मॅच आधीच 'आउट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Imam Ul Haq Replacement Of Fakhar Zaman For Champions Trophy 2025 :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद भुषवणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला पहिल्या लढतीत न्यूझीलंडच्या संघानं यजमानांना पराभवाचा धक्का दिला. दुसरीकडे याच सामन्यातील पहिल्याच षटकात पाकिस्तानचा मोहरा जायबंदी झाला. गत हंगामात   टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळी करून संघाला चॅम्पियन करण्यात ज्या फखर झमान याने मोलाचा वाटा उचलला होता तो आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाविरुद्ध भिडण्याआधीच फसवा ठरला पाकचा डाव

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं टीम इंडियाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. या फायनल लढतीत फखर झमान याने शतकी खेळी केली होती. पाकिस्तानच्या संघानं यंदाच्या हंगामात सर्वात शेवटी आपला संघ जाहीर केला. बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असणाऱ्या फखर झमानला त्यांनी संघात घेतलं. पाकनं खेळलेली ही चाल भारताविरुद्धची त्याची मागची कामगिरी बघूनच केलीये, हे स्पष्ट होते. पण हा मोहरा टीम इंडियाविरुद्धच्या मॅचमध्ये चेहरा दाखवण्याआधीच स्पर्धेबाहेर झालाय. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच लढतीत फिल्डिंग करताना तो दुखापतग्रस्त झाला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झालेला फखर झमान बॅटिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्याने ४१ चेंडूत २४ धावा केल्या. त्याच्यावर आता स्पर्धेतून बाहेर होण्याची  नामुष्की ओढावलीये. त्यामुळे पाकचा डावच फसलाय. 

वादग्रस्त चेहऱ्याची पाक संघात एन्ट्री

फखर झमान संघाबाहेर पडल्यावर आता पाकिस्तान संघानं खेळापेक्षा बाहेरच्या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या चेहऱ्याला संघात संधी दिलीये. दुखापतग्रस्त फखर झमानच्या जागी  इमाम उल हकची पाकच्या ताफ्यात एन्ट्री झाली आहे.२०१९ मध्ये या खेळाडूवर अनेक तरुणींशी अफेअर्स अन् त्यांची फसवणूक केल्याचे आरोप या क्रिकेटरवर झाले होते. या प्रकरणात त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे माफीही मागितली होती.

माजी क्रिकेटरचा भाचा, असा आहे वनडेतील रेकॉर्ड

इमाम उलहक हा  पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर माजी कॅप्टन आणि निवड समितीचा अध्यक्ष  इंझमाम-उल-हक याचा भाचा आहे. २०१७ मध्ये वनडे पदार्पण करणाऱ्या इमामनं ७२ वनडेत ४८ पेक्षा अधिकच्या सरासरीनं ३१३८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात ९ शतकासह २० अर्धशतकांची नोंद आहे. 

Web Title: ICC Champions Trophy 2025 Fakhar Zaman ruled out Imam Ul Haq Replace Him See ODI Record And Stats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.