Join us

MS Dhoni च्या विधानाने इलॉन मस्क यांना बसणार आर्थिक फटका? Twitter बाबत केलं मोठं विधान

महेंद्रसिंग धोनी तसा सोशल मीडियापासून दूरच असतो, परंतु तो जी काही घोषणा करतो त्यासाठी फेसबूक किंवा इंस्टाग्रामचाच वापर अनेकदा करताना दिसला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:10 IST

Open in App

१५ ऑगस्ट २०२० मध्ये महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना धक्का दिला... त्याने निवृत्तीची घोषणा इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करून दिली. त्यात त्याने लिहीले होते की, ''तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी आभार... सायंकाळी ७.२९ वाजल्यानंतर मी निवृत्त झालोय असं समजा.'' महेंद्रसिंग धोनी तसा सोशल मीडियापासून दूरच असतो, परंतु तो जी काही घोषणा करतो त्यासाठी फेसबूक किंवा इंस्टाग्रामचाच वापर अनेकदा करताना दिसला आहे.  

महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट

त्याने अधिकृतपणे IPL मधून निवृत्ती जाहीर केलेली नसली तरी, चाहत्यांनी MS Dhoni च्या इंस्टाग्राम पोस्टसाठी Notifications आधीच चालू केले असावेत, कदाचित २०२० प्रमाणे यो इथेही तशी काही घोषणा करेल. बऱ्याचदा अनेक सेलिब्रेटी त्यांच्या ट्विटर ( जे आता एक्स) अकाऊंटवरून घोषणा करताना दिसतात पण, धोनी तसं करत नाही आणि का, याचे उत्तरही त्याने दिले. जे इलॉन मस्क यांना विचार करायला लावणारे आहे. इलॉन मस्क यांनी X विकत घेतले आहे.

“मी ट्विटरपेक्षाइन्स्टाग्रामला प्राधान्य देतो. Twitter वर काहीही चांगले घडत नाही, असे माझे ठाम मत आहे. तुम्हाला माहिती आहे, विशेषत: भारतात नेहमीच वाद होतात. कोणीतरी काहीतरी लिहील आणि त्याचे रूपांतर वादात होते. त्यामुळे मला या प्लॅटफॉर्मवर असण्याची गरज का आहे?, याचा मी विचार करतो. तिथे तुम्हाला १४० शब्दांची मर्यादा आहे आणि मोजक्या शब्दात तुम्ही भावना व्यक्त करू शकत नाही.  कल्पना करा की, मी तिथे काहीतरी लिहीले आणि नंतर ते वाचणे लोकांवर सोडले.  ते मग त्यातून काय अर्थ लावायचा आहे तो लावतात,''असे धोनी म्हणाला.

त्याने पुढे सांगितले, त्यामुळे ट्विटर हे माझ्यासाठी नाही. इंस्टाग्राम अजूनही, मला ते आवडते कारण, मी माझे चित्र किंवा व्हिडिओ किंवा काहीतरी पोस्ट करू शकतो आणि त्यातून तुम्हाला योग्य ते समजू शकते.  त्यातही आता बदल होत आहे. म्हणून मी अजूनही इन्स्टाग्रामला प्राधान्य देतो. पण मी फार सक्रिय नाही कारण, कमी विचलित होणे हे चांगले आहे. पण, यावर मी अपडेट्स टाकत राहीन, जेणेकरून तुम्हाला माझी माहिती मिळत राहील. त्यामुळे मला जे आवडते ते मी करत आहे.”

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीट्विटरएलन रीव्ह मस्कइन्स्टाग्राम