Join us

सुनील गावस्कर यांनी कोणत्या संघाविरुद्ध घेतली होती 10 हजारावी धाव? पाहा तो ऐतिहासिक क्षण

आपल्यापैकी अनेकांनी तो ऐतिहासिक क्षण पाहिलाही नसावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 15:22 IST

Open in App

भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज, कसोटीच्या दोन्ही डावांत तीन वेळा शतक झळकावणारे पहिले फलंदाज, 2005पर्यंत सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्यांच्या नावावर होता आणि कसोटीत 100 झेल टिपणारे पहिले भारतीय क्षेत्ररक्षक आदी अनेक विक्रम नावावर लिटिल मास्टर गावस्कर यांच्या नावावर आहेत. पण, गावस्कर यांनी 10 हजारावी धाव कोणत्या संघाविरुद्ध केली हे आठवतंय का? आपल्यापैकी अनेकांनी तो ऐतिहासिक क्षण पाहिलाही नसावा...

10 जुलै 1949मध्ये गावस्कर यांचा जन्म झाला. 1971मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पदार्पण केले आणि तीन वर्षानंतर त्यांनी पहिला वन डे सामना खेळला. त्यांनी 125 कसोटी सामन्यांत 51.12च्या सरासरीनं 10122 धावा केल्या आहेत. नाबाद 236 ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. कसोटीत त्यांनी 34 शतकं झळकावली आहेत, तर 45 अर्धशतकं आहेत. वन डेत त्यांनी 108 सामन्यांत 3092 धावा केल्या असून एकमेव शतक झळकावलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे ते पहिलेच फलंदाज ठरले होते.

1986-87 च्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात आला आणि त्यात त्यांनी हा पराक्रम केला. त्यांच्या या विक्रमी धावेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ...  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

शाहरुख खाननं दिलेला शब्द पाळला नाही; सौरव गांगुलीचा KKRवर गंभीर आरोप

टॅग्स :सुनील गावसकरभारत विरुद्ध पाकिस्तान