legends League Cricket:भारताविरूद्धच्या सामन्यातून गिब्स बाहेर; BCCI वर केले होते गंभीर आरोप

लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:02 PM2022-08-14T15:02:42+5:302022-08-14T15:05:42+5:30

whatsapp join usJoin us
Herschelle Gibbs is being trolled as soon as he was ruled out of the Legends League cricket match against India | legends League Cricket:भारताविरूद्धच्या सामन्यातून गिब्स बाहेर; BCCI वर केले होते गंभीर आरोप

legends League Cricket:भारताविरूद्धच्या सामन्यातून गिब्स बाहेर; BCCI वर केले होते गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्शल गिब्स भारताविरूद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकणार आहे. पाकिस्तानमधील काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळल्यामुळे गिब्जच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला संधी देण्यात आली आहे. माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १६ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे.

दरम्यान, लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सहा शहरांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमधील इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स या दोन संघांतील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तब्बल १० देशातील खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. राहिलेल्या ४ फ्रँचायझींची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या हंगामात एकूण १५ सामने खेळवले जाणार आहे.

BCCI ला केले होते ट्रोल


सर्वप्रथम गिब्सला वर्ल्ड स्क्वॉडमध्ये स्थान मिळाले होते, ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. कारण गिब्सने काश्मीर प्रीमियर लीगमध्ये देखील सहभाग घेतला होता. गिब्सच्या नावामुळे मोठा वाद चिघळला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली करणार आहेत. तर वर्ल्डच्या संघाची धुरा इयॉन मॉर्गनकडे असेल. गिब्सला भारतात खेळण्याची संधी दिल्याने गांगुली आणि बीसीसीआयला ट्रोल करण्यात आले होते.

गिब्सने बोर्डावर केला होता आरोप
कश्मीर प्रीमियर लीग या पाकिस्तानातील लीगमध्ये खेळू दिले जात नसल्याचा आरोप गिब्सने बीसीसीआयवर केला होता. याशिवाय बीसीसीआय राजकारण आणि क्रिकेट यांची सांगड घालत धमकावत असल्याचा आरोपही त्याने केला होता. त्यामुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सूर पसरला आणि अखेर गिब्सला पहिल्या सामन्यातून पायउतार व्हावे लागले. 

इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी. 

रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.  



 

Web Title: Herschelle Gibbs is being trolled as soon as he was ruled out of the Legends League cricket match against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.