Rahul Dravid : कर्णधार लोकेश राहुलचा केला बचाव, पण राहुल द्रविडनं संघाच्या कामगिरीवरून खेळाडूंचे टोचले कान

India vs South Africa ODI series : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच वन डे मालिकेत भारतीय संघाला ३-० असा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:45 AM2022-01-24T09:45:59+5:302022-01-24T09:50:53+5:30

whatsapp join usJoin us
'He is just starting out': Rahul Dravid defends KL Rahul's captaincy after ODI series defeat in South Africa | Rahul Dravid : कर्णधार लोकेश राहुलचा केला बचाव, पण राहुल द्रविडनं संघाच्या कामगिरीवरून खेळाडूंचे टोचले कान

Rahul Dravid : कर्णधार लोकेश राहुलचा केला बचाव, पण राहुल द्रविडनं संघाच्या कामगिरीवरून खेळाडूंचे टोचले कान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa ODI series : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच वन डे मालिकेत भारतीय संघाला ३-० असा पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यांनतर भारतीय संघाला पराभवाचे धक्के बसले. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं ( Rahul Dravid) लोकेशचा बचाव करताना हा पराभव आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं आपले डोळे उघडणारा ठरला असे मत  व्यक्त केले. 

तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या ( १२४) शतकी, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनच्या ( ५२) अर्धशतकी  आणि डेव्हिड मिलर ( ३९) व ड्वेन प्रेटोरीयस ( २०) यांच्या योगदानाच्या जोरावर २८७ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक ३, दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना भारताला २८३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

मधल्या फळीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. शिखर धवन ( ६१) व विराट कोहली ( ६५) खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीय संघ जिंकेल असे वाटत होते. श्रेयस अय्यर ( २६) व सूर्यकुमार यादव ( ३९) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. दीपक चहरनं ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ५४ धावा करताना भारताला विजयी मार्गावर आणले होते, परंतु अवघ्या ४ धावांनी आफ्रिकेनं बाजी मारली. 

या पराभवानंतर लोकेशच्या कर्णधारपदावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, परंतु द्रविडनं त्याचा बाव केला. ''लोकेशनं त्याचं काम चांगले केले. कर्णधार म्हणून त्याची ही सुरुवात आहे आणि माझ्यामते त्यानं प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडली. तो कर्णधार म्हणून सातत्यानं सुधारणा करेल,''असे मत द्रविडनं व्यक्त केले. खेळाडूंना त्यांच्या कौशल्यानुसार खेळ दाखवता आला नाही, असेही सांगून ही मालिका आयसीसी वर्ल्ड कप २०२३च्या दृष्टीनं सर्वांचे डोळे उघडवणारी ठरली, असेही द्रविड म्हणाला.

''आमचे डोळे उघडणारा हा निकाल आहे, परंतु आम्ही जास्त वन डे क्रिकेट खेळलेलो नाही.  मार्च महिन्यात मुख्य खेळाडूंच्या फळीसह आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यानंतर दुसरी फळी घेऊन श्रीलंकेत खेळलो. पुढच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत आम्ही मर्यादित षटकांचे बरेच सामने खेळणार आहोत. आता काही प्रमुख खेळाडू नव्हते आणि ते आल्यावर हा संघ वेगळ्याच फॉर्मात दिसेल,''असेही तो म्हणाला.
 

Web Title: 'He is just starting out': Rahul Dravid defends KL Rahul's captaincy after ODI series defeat in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.