Join us

विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा

नेमकं त्यावेळी काय घडलं? विजय मल्ल्यानं शेअर केली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ खरेदी करण्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:41 IST

Open in App

Vijay Mallya Explain Why Buy RCB Team : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या १८ व्या हंगामात अखेर जेतेपद पटकावले. आरसीबीनं पहिली वहिली ट्रॉफी उंचावल्यावर या संघाचा पहिला मालक विजय मल्या देखील चर्चेत आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फरार असलेला उद्योजक विजय मल्ल्या याने RCB च्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर आता राज समानीच्या पॉडकास्ट शोमध्ये दिलेली त्याची मुलाखत चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ खरेदी करण्यामागची गोष्ट शेअर केलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तो RCB चा मालक झाला, पण... 

२००८ च्या पहिल्या हंगामात ८ संघांवर बोली लागली होती. विजय मल्ल्या हा त्यावेळी RCB चा मालक झाला. पण त्याची पहिली पसंती हा बंगळुरुचा संघ मूळीच नव्हता. खुद्द मल्ल्याने याबाबत खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये तो म्हणाला की, त्यावेळी मी तीन फ्रँतायझीवर बोली लावली होती. ज्यात मुंबई इंडियन्सचाही समावेश होता. पण ही टीम मुकेश अंबानींची झाली अन् शेवटी विजय मल्ल्या १२ मिलियन डॉलरसह RCB चा मालक झाला होता. 

"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."

मुंबई इंडियन्सवर बोली लावली होती बोली

हजारो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विजय मल्ल्यानं राज समानी याला दिलेल्या मुलाखतीत RCB चा मालक झाल्याची  खास स्टोरी शेअर करताना मुंबई इंडियन्सवर लावलेला डाव फसल्याची गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, ललित मोदी यांनी बीसीसीआयला दिलेल्या या लीगच्या संकल्पनेमुळे प्रभावित झालो होतो. एक दिवस त्यांनी मला बोलवले आणि यापैकी एखादी टीम खरेदी करण्यास इच्छुक आहात का? असे विचारले. यावेळी मी तीन फ्रँचायझीसाठी बोली लावली. खूप कमी पैशासह मुंबई इंडियन्सवर लावलेली बोली हरलो. माल्या पुढे म्हणाला की, २००८ मध्ये आरसीबी फ्रँचायझीवर बोली लावली त्यावेळी आयपीएलला भारतीय क्रिकेटमधील गेम चेंजरच्या रुपात पाहिले. शेवटी ११२ मिलियन डॉलरच्या बोलीसह RCB टीम खरेदी केली. त्यावेळीची ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी बोली होती.   आपल्या ब्रँडचा प्रसार करण्याच्या हेतूनचं  खरेदी केली होती टीम

आरसीबी एक असा ब्रँड करायचा होता जो क्रिकेटच्या मैदानाच नाही तर मैदानाबाहेरही ओळखला जाईल. त्यामुळेच या संघाचे नाव सर्वाधिक खप असलेल्या मद्य ब्रँडशी कनेक्टेड केले. टीम खरेदी करण्यामागे क्रिकेट प्रेम वैगेरे अजिबात नव्हते. व्हिस्की ब्रँडच प्रमोशन हाच यामागचा हेतू होता, असेही विजय मल्ल्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविजय मल्ल्यामुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट