भारतीय संघात बुमराहची एन्ट्री झाल्यानं आम्ही खूप मजबूत झालो आहोत - मोहम्मद शमी

asia cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक आणि वन डे विश्वचषक या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 03:22 PM2023-08-31T15:22:10+5:302023-08-31T15:22:31+5:30

whatsapp join usJoin us
 HAVING BUMRAH IN THE SQUAD HAS MADE US VERY STRONG says indian bowler MOHAMMED SHAMI ahead of asia cup 2023 first match  | भारतीय संघात बुमराहची एन्ट्री झाल्यानं आम्ही खूप मजबूत झालो आहोत - मोहम्मद शमी

भारतीय संघात बुमराहची एन्ट्री झाल्यानं आम्ही खूप मजबूत झालो आहोत - मोहम्मद शमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघ आशिया चषक आणि वन डे विश्वचषक या मोठ्या स्पर्धांसाठी सज्ज झाला आहे. कालपासून आशिया चषकाला सुरूवात झाली असून सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळवला गेला. विजयी सलामी देत यजमान पाकिस्तानने नवख्या नेपाळचा दारूण पराभव केला. शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेतून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताचा गोलंदाजी अटॅक अधिक मजबूत झाला आहे. बुमराहचा सहकारी गोलंदाज मोहम्मद शमीने आशिया चषकातील सलामीच्या सामन्यापूर्वी आपली मानसिकता आणि रणनीती स्पष्ट केली आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शमीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

शमीने सांगितले की, मोठ्या स्पर्धेपूर्वी आमची नेहमीच तयारी असते. आम्हाला वाटते की आम्हाला परिस्थितीचे खूप विश्लेषण करावे लागेल, आमच्याकडे कौशल्य आणि बॉलिंग लाइनअप आहे, त्यामुळे आम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. वन डे सामन्यांमध्ये नवीन रणनीती आखायला हवी. माझ्याकडे नवीन चेंडू आहे की नाही किंवा संघाला सामन्यादरम्यान कोणत्याही टप्प्यावर माझी गरज आहे की नाही यावर अवलंबून आहे. नवीन चेंडू किंवा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही. 

भारताचं त्रिकुट आशिया चषकासाठी सज्ज
तसेच मी सिराज आणि बुमराह आम्ही तिघेही चांगली गोलंदाजी करत आहोत. त्यामुळे कोण खेळणार हे व्यवस्थापनावर अवलंबून आहे. आमचे एकच ध्येय आहे ते म्हणजे आमचे १००% देणे. जर आम्ही असे केले तर १०० टक्के निकाल आमच्या बाजूने असेल. मोठ्या कालावधीनंतर आमच्याकडे जस्सी (बुमराह) नव्हता, त्यामुळे आम्हाला त्याच्यासारखा चांगला खेळाडू गमावल्याचे जाणवले. कधी कधी त्याची आम्हाला खूप उणीव भासायची. पण, आता बुमराहचे पुनरागमन झाल्याने आम्ही अधिक मजबूत बनलो आहोत, तो तंदुरुस्त दिसत आहे आणि तो चांगला खेळत आहे, असेही शमीने नमूद केले.

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

Web Title:  HAVING BUMRAH IN THE SQUAD HAS MADE US VERY STRONG says indian bowler MOHAMMED SHAMI ahead of asia cup 2023 first match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.