वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दिमाखदार विजयासह केली आहे. हमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. सिडनीच्या मैदानातील टी-२० सामन्यासह भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय महिला संघाने अवघ्या १३३ धावांत रोखलं होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावांचा पाठलाग करताना पाचव्या षटकातच टीम इंडियाच अर्धशतक, अन्...
धावांचा पाठलाग करताना भारतीय धावफलकावर १ विकेट्सच्या मोबदल्यात ५.१ षटकात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला. शेफाली वर्मा ११ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. स्मृती मानधना १६ (१७) आणि जेमिमा रॉड्रिग्ज ९ (३) धावांवर खेळत असताना पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबला त्यावेळी भारतीय महिला संघाने ५.१ षटकानंतर एका विकेट्सच्या मोबदल्यात ५० धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाने २१ धावांनी हा सामना जिंकला.
Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले...
हरमनप्रीत कौरनं अप्रतिम झेलसह लुटली मैफिल
भारतीय महिला संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत टीम इंडियाला खूप सुधारणा करण्याची गरज आहे, अशी चर्चा भारतीय महिला संघाच्या सामन्यानंतर नेहमी पाहयला मिळते. पण यावेळी हरमनप्रीत कौरनं क्षेत्ररक्षणातील कर्तृत्व दाखवत देत कमालीच्या झेल टिपत एलिसा पेरीच्या खेळीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील आठव्या षटकात अरुंधती रेड्डी गोलंदाजी करत होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एलिसा पेरीनं मोठा फटका खेळला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं मागे धावत जाऊन अफलातून झेल टिपला. भारतीय महिला संघाच्या विजयासह हरमनप्रीत कौरच्या अप्रतिम झेलची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
भारतीय महिला संघाची मालिकेत १-० अशी आघाडी
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसह ३ सामन्यांची वनडे आणि एकमेव कसोटी मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेतील सिडनीच्या मैदानातील विजयासह भारतीय संघाने दौऱ्याची सुरुवात दमदार केली आहे. हाच सिलसिला कायम ठेवून भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Web Summary : India Women started their Australia tour with a win. Harmanpreet Kaur's stunning catch and a strong batting performance, aided by DLS, secured a 21-run victory in the first T20. India leads the series 1-0.
Web Summary : भारतीय महिला टीम ने ऑस्ट्रेलिया दौरे की शुरुआत जीत के साथ की। हरमनप्रीत कौर के शानदार कैच और मजबूत बल्लेबाजी प्रदर्शन से भारत ने पहले टी20 में 21 रन से जीत हासिल की। भारत श्रृंखला में 1-0 से आगे।