Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...

...अन् पांड्या भाऊनं आपल्याच विकेटचं केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:27 IST

Open in App

Hardik Pandya Playfully Hugged Ravi Bishnoi After Being Dismissed In SMAT 2025 : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात धमाकेदार अंदाजात कमबॅक केले आहे. आशिया कप टी-२० स्पर्धेत दुखापतीमुळे तो गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. बडोदा संघाकडून हिट शो दाखवून देत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी फिटनेस सिद्ध केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कमबॅकच्या पहिल्या सामन्यापासून चर्चेत आहे पांड्या; त्यात नव्या व्हिडिओची भर

टीम इंडियात एन्ट्री करण्याआधी देशांतर्गत क्रिकेटसाठी मैदानात उतरल्यापासून हार्दिक पांड्या चर्चेचा विषय ठरत आहे. सामना थांबवून चाहत्यासोबत सेल्फीसाठी दिलेली पोझनंतर आता हार्दिक पांड्या  विकेट घेणाऱ्या गोलंदाजासोबतच आपल्या विकेटच सेलिब्रेशन करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.   

कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ

हार्दिक पांड्या मोठा फटका मारुन मॅच संपवण्याच्या नादात फिरकीच्या जाळ्यात फसला

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील एलिट ग्रुप-सीच्या सामन्यात बडोदा आणि गुजरात यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना १४.१ षटकांत ७३ धावांतच आटोपला. अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना १० धावांची गरज असताना हार्दिक पांड्या मोठा फटका मारून सामना संपवायला गेला अन् तो फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जाळ्यात फसला. तो बाद झाल्यावर बडोदा संघाने गुजरातला ८ विकेट्सनं सामना सहज खिशात घातला. पण चर्चा रंगली ती हार्दिक पांड्याने विकेट गमावल्यावर केलेल्या त्या खास कृतीची.

मग रवी बिश्नोईसमोबत आपल्याच विकेटचं केलं सेलिब्रेशन

गुजरात विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांडयाची विकेट मिळवल्यावर रवी बिश्नोई आपल्या सिग्नेचर स्टाइलमध्ये त्याच्या विकेटचं सेलिब्रेश करताना पाहायला मिळाले. मग हार्दिक पांड्याही त्याला जॉइन झाला. विकेट घेणाऱ्या बिश्नोईची गळाभेट घेत त्यानेही आपल्या विकेटचं सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. पांड्याचा हा हटके अंदाज सामन्यात लक्षवेधी ठरला. सामन्याबद्दल बोलायचं तर बडोदा संघाने हा सामना २ विकेट्स गमावत ४० चेंडूत संपवला. बडोदा संघाच्या विजयासह पांड्याच्या स्वॅग सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५