Harbhajan Singh On India Loss vs South Africa : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला पराभूत करून इतिहास रचला. ३० धावांची पिछाडी भरून काढत WTC चॅम्पियन संघाने भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाचा धक्का दिला. १५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतात कसोटी सामना जिंकला. या विजयासह टेम्बा बावुमाचा कॅप्टन्सीतील विजयी मालिकेचा सिलसिला कायम राहिला. भारतीय संघातील फलंदाजीशिवाय खेळपट्टीच्या नखरेल अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा माजी कर्णधार हरभजन सिंग याने भारतीय संघाच्या पराभवानंतर "त्यांनी टेस्टची वाट लावली..." अशा कठोर शब्दांत कसोटी क्रिकेटमध्ये जे सुरु आहे ते धोकादायक असल्याचे रोखठोक मत मांडले आहे. नेमकं तो कुणाला अन् काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन सिंग याने कोलकाताच्या मैदानातील भारतीय संघाच्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. कसोटी क्रिकेटसाठी संघ व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक ‘रँक टर्नर’ म्हणजेच फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयारी करण्यावर भर दिला जातो, असा आरोप भज्जीनं केला आहे. अशा प्रकारच्या खेळपट्टीमुळेच कसोटी क्रिकेटची वाट लावली आहे . टेस्ट क्रिकेट संपलं आहे, अशा आशयाच्या शब्दांत भज्जीनं खेळपट्टी तयार करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
टर्निंग पिचच्या मुद्यावरुन माजी फिरकीपटूंनं कुणावर साधला निशाणा?
हरभजन सिंग आपल्या युट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये पुढे म्हणाला आहे की, या विषयावर कुणाला काहीच बोलायचं नाही. कारण सर्वांना सर्व ठीक चाललंय असेच वाटते. संघ जिंकतो. कुणी अधिक विकेट घेत महान बनतो आहे. त्यामुळे प्रश्न विचारले जात नाहीत. खेळपट्टीचा हा खेळ आज सुरु झालेला नाही. अनेक वर्षांपासून मी हे पाहत आलो आहे. हा मार्ग चुकीचा आहे. जरी विजय मिळाला तरी त्यात संघाची प्रगती नाही, हे आपल्या लक्षातच येत नाही, असे म्हणत कसोटी क्रिकेट वाचवायचं असेल तर हा खेळ बंद करायला हवा, असे रोखठोक मत हभजन सिंगने मांडले आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना अडीच दिवसात संपला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात १५ विकेट्स पडल्या. भारतीय फलंदाजी मागील ६ सामन्यात चौथ्यांदाच परदेशी ताफ्यातील फिरकीच्या जाळ्यात फसल्याचे पाहायला मिळाले. याआधी न्यूझीलंडच्या संघाने भारतीय मैदानात टीम इंडियाला १२ वर्षांनी ३-० अशी मात देत मोठा धक्का दिला होता. त्यात आता दक्षिण आफ्रिकनही टीम इंडियाला मोठा दणका दिला आहे.
घरच्या मैदानातील मागील ६ कसोटी सामन्यात भारतीय संघावर चौथ्यांदा ओढावली नामुष्की