Join us

Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती

जे संघात असतील अशी चर्चा रंगतीये त्यांना काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:45 IST

Open in App

Harbhajan Singh Picks Indian Squad For Asia Cup 2025 : भारताच्या यजमानपदाखाली होणारी यंदाची आशिया कप स्पर्धा ही युएईतील अबू धाबी आणि दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरपासून  टी-२० प्रकारात रंगणाऱ्या स्पर्धेसाठी १९ ऑगस्टपर्यंत भारतीय संघाची घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हरभजन सिंगनं शर्यतीत नसणाऱ्यांना दिली पसंती

या संघात कुणाला संधी मिळणार अन् कुणाचा पत्ता कट होणार याची चर्चा रंगत असताना माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं आशिया कपसाठी भारतीय संघ निवडला आहे. आगामी स्पर्धेसाठी जी नाव चर्चेत आहेत, त्यांना नापसंती दर्शवत भज्जीनं शर्यतीत नसणाऱ्या दोघांना पसंती दिलीये. इथं एक नजर टाकुयात आशिया कपसाठी हरभजन सिंगन निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनवर...

विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जे संघात असतील अशी चर्चा रंगतीये त्यांना काढलं बाहेर

आशिया कप स्पर्धेसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू सॅमसनला पसंती दिली जाईल, अशी चर्चा रंगतीये. एवढेच नाही तर तिलक वर्माही या संघाचा भाग असेल, असे बोलले जात आहे. पण हरभजन सिंगनं या चर्चित नावांपेक्षा वेगळ्या गड्यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण भारतीय टी-२० संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत भज्जीनं  केएल राहुल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि रियान पराग यांना पसंती दिलीये. 

अभिषेक शर्मासोबत यशस्वीच वाटतो परफेक्ट ओपनर

आशिया कप स्पर्धेसाठी अभिषेक शर्मासोबत यशस्वी जैस्वाल याने भारतीय डावाची सुरुवात करावी, अशी इच्छा हरभजन सिंगनं व्यक्त केली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीखालील संघात त्याने शुबमन गिल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगची निवड केलीये. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे त्याला वाटते.

टॅग्स :एशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघहरभजन सिंगसंजू सॅमसनलोकेश राहुल