Join us

क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर झाला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा चाहता

काही वेळा आपल देवत्व विसरून देव भक्तांच्या प्रेमात पडल्याचे ऐकिवात आहे. भारतात क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो. आणि हा देवही एका चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. हा चिमुकला आहे फक्त दोन वर्षांचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 15:43 IST

Open in App
ठळक मुद्देजवळपास २४ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा सचिन या चिमुकल्याच्या प्रेमात पडला तरी का आणि कसा...

नवी दिल्ली : काही वेळा आपल देवत्व विसरून देव भक्तांच्या प्रेमात पडल्याचे ऐकिवात आहे. भारतात क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो. आणि हा देवही एका चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. हा चिमुकला आहे फक्त दोन वर्षांचा. जवळपास २४ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा सचिन या चिमुकल्याच्या प्रेमात पडला तरी का आणि कसा...

काही दिवसांपूर्वी मोहसिन या व्यक्तीने आपल्या भाच्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ ट्विटरवर पोस्ट कोला आहे. या व्हीडीओमध्ये हा चिमुकला प्लॅस्टीकच्या बॅटने मोठे फटके लगावत असल्याचे दिसत आहे. मोहसिन यांनी हा व्हीडीओ सचिनसह भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना टॅग केला आहे.

मोहसिनचा हा व्हीडीओ सचिनने पाहिला आणि त्याला या चिमुकल्याची फलंदाजी आवडली. ... अन् हा क्रिकेटचा देव चक्क त्याचा चाहता झाला. 

या व्हीडीओतील चिमुकल्याची फलंदाजी पाहून सचिन म्हणाला की, " स्ट्रेट ड्राइव्ह, उंचपुरे फटके, फ्लिक्स... ग्रेट. हा नव्या युगाचा खेळाडू आहे. तू चांगली फलंदाजी करत आहेस. असंच चांगलं खेळत राहा आणि खेळाचा आनंद लुटत राहा. " 

टॅग्स :सचिन तेंडूलकरविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीक्रिकेटट्विटरसोशल मीडिया