Join us  

तीन महिने सराव अन् तीन रणजी सामने खेळू द्या; असं का म्हणतोय सौरव गांगुली?

प्रिन्स ऑफ कोलकातानं 2008मध्ये नागपूर येथे अखेरचा कसोटी सामना खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 4:06 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करू शकतो, असा आत्मविश्वास आहे. प्रिन्स ऑफ कोलकातानं 2008मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात तो गोल्डन डकवर बाद झाला, परंतु पहिल्या डावात त्यानं 8 चौकार अन् एक षटकारासह 85 धावा केल्या होत्या.  

लागली पैज; क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजाला अशा 'विचित्र' पद्धतीनं बाद झालेलं पाहिलं नसेल 

2020मध्ये आता गांगुलीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) अध्यक्षपद आहे. तत्पूर्वी त्यानं बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. नुकताच गांगुलीनं 48वा वाढदिवस साजरा केला आणि त्यावेळी त्यानं पुन्हा भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी तीन महिन्याचा सराव अन् तीन रणजी सामने खेळणे पुरेसे असल्याचे मत व्यक्त केले.

अजूनही टीम इंडियासाठी कसोटीत धावा करू शकतो, असा दावा गांगुलीनं केला आहे.  2007मध्ये त्यानं अखेरचा वन डे सामना खेळला. यावेळी त्यानं संघातून वगळल्याबद्दल नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''मला दोन वन डे मालिका खेळण्यास दिले असते, तर मी धावा चोपल्या असत्या. मी नागपूर कसोटीत निवृत्त झालो नसतो, तर पुढील दोन मालिकांमध्ये धावा केल्या असत्या. आताही मला सहा महिने सरावाला दिले आणि तीन रणजी सामने खेळण्यास दिले, तर मी भारतासाठी धावा करू शकतो. सहा महिन्याचीही गरज नाही, मला तीन महिने पुरेसे आहे.''

हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

''मला तुम्ही खेळण्याची संधी दिली नसली तरी माझ्या आतला आत्मविश्वास तुम्ही कसा मोडू शकता?,''असेही गांगुलीनं सांगितले. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 311 सामन्यांत 22 शतकं आणि 72 अर्धशतकांसह 11363 धावा केल्या आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही! 

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! 

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस

 

टॅग्स :सौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघ