Gautam Gambhir Took Charge Rohit Sharma Remove ODI Captain : कसोटी पाठोपाठ भारतीय एकदिवसीय क्रिकेटमध्येही गिल-गंभीर पर्वाला सुरुवात झालीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. १९ ऑक्टोबरपासून पर्थच्या मैदानातून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेची संघ निवड केल्यावर रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यामागचं कारणही BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले. पण आता यासंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे नाव समोर येत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण दिले, पण आतली गोष्ट वेगळीच
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेसाठी संघ निवडीनंतर टीम इंडियात झालेल्या खांदेपालटसंदर्भात मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले की, तिन्ही फॉर्मॅटसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवणं कठीण होतं. त्यामुळे शुबमन गिलकडे नेतृत्व देण्यात आले. पण जे सांगितलं जातंय त्यामागची खरी स्टोरी वेगळीच असल्याची गोष्ट समोर येत आहे.
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
दोन कसोटी मालिकेतील पराभव अन् गौतम गंभीर ड्रायव्हर सीटवर
टाइम्स ऑफ इंडियाने BCCI च्या एका सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, रोहितला वनडे कर्णधारपदापासून दूर ठेवण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे ड्रेसिंग रूममधील संस्कृती (टीम कल्चर) त्याच्या प्रभाव राहिला असता. ३८ वर्षीय रोहितच्या विचारधारेसह संघ पुढे न्यायला संघ व्यवस्थानपनाला मान्य नव्हते. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या सहा महिन्यांत थोडे मागे हटले होते, कारण त्या काळात बहुतेक निर्णय रोहितच घेत होता. मात्र, न्यूझीलंड (घरच्या मैदानावर) आणि ऑस्ट्रेलिया (परदेशात) यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकांतील पराभवानंतर गंभीर पुन्हा पुढे आले आणि स्वतः निर्णय घेण्याचं नेतृत्व हाती घेतलं, असा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
२०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याबाबतही अनिश्चितता
हित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी खेळाडू म्हणून संघात निवड झाली आहे. मात्र, त्यांची निवड आता केवळ कामगिरी आणि फिटनेसच्या आधारावर केली जाईल. या दोघांचं २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी संघात स्थान निश्चित नाही. त्यांना विश्वचषकात खेळायचं असेल, तर सातत्याने धावा काढाव्या लागतील. त्यामुळे ही जोडी या परीक्षेत पास होणार का? ते पाहण्याजोगे असेल.