Gautam Gambhir on Rohit Sharma, Team India Playing XI Aus vs Ind 5th Test : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघाचा दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी या काळात होणार आहे. हा सामना भारताला WTC Final 2025 च्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी कसोटी सिडनीत सुरू होणार आहे. पण त्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत आता चर्चा रंगली आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराच्या खेळाबाबत अद्याप सस्पेन्स आहे आणि गौतम गंभीरनेही पत्रकार परिषदेत या प्रश्नाचे थेट उत्तर न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सिडनी कसोटीत खेळणाऱ्या रोहित शर्मावर सस्पेन्स
पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला थेट प्रश्न विचारण्यात आला की रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार आहे का? ज्यावर गंभीर म्हणाला की, नाणेफेकीच्या वेळी याचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. रोहित शर्मा कर्णधार आहे. आणि संघात कर्णधाराचे स्थान आधीच निश्चित झालेले असते. आता अशा परिस्थितीत जेव्हा संघाचा कोच पत्रकार परिषदेत येऊन त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय टॉसच्या वेळीच घेतला जाईल, असे सांगतो तेव्हा प्रकरण थोडे गंभीर असण्याची शक्यता असते. रोहितच्या खेळण्याच्या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला की, आम्ही सामन्याच्या दिवशी पिच पाहून मग प्लेइंग इलेव्हन ठरवू.
कर्णधार रोहित शर्माच्या खेळावर प्रश्नचिन्ह का?
प्रश्न असा आहे की टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मुख्य प्रशिक्षकाने स्पष्ट उत्तर दिले, याचा अर्थ रोहितची कसोटीतील कामगिरी समाधानकारक नाही. रोहित शर्माने सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या ५ डावांत केवळ ३१ धावा करु शकला आहे. म्हणजेच त्याची फलंदाजीची सरासरी केवळ ६.२० आहे. ही सरासरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या जगातील कोणत्याही कसोटी कर्णधाराच्या तुलनेत सर्वात कमी आहे. त्यामुळेच रोहितला संघाबाहेर बसवण्याचा कठोर निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते.
आकाशदीप पाचव्या कसोटीतून बाहेर
गौतम गंभीरने आकाशदीप परिस्थिती स्पष्ट केली. एका प्रश्नाच्या उत्तरात गौतम गंभीर म्हणाला की, वेगवान गोलंदाज आकाशदीप पाचव्या कसोटीत खेळू शकणार नाही. पाठीच्या समस्येमुळे आकाश संघाबाहेर आहे. त्यामुळे संघात एक बदल होणार, हे नक्की आहे.