Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाने टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील दहाव्या हंगामात तिसऱ्यांदा जेतेपद पटकावत छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा धमाका केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम रंगलेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला ९६ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने ट्रॉफीचा बचाव करताना अनेक विक्रम प्रस्थापित केले. गौतम गंभीर खेळाडू आणि प्रशिक्षकाच्या रुपात भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले क्रिकेटर ठरले. ऐतिहासिक जेतेपदानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोखठोक मतांनी चर्चेत आल्यावर आता गौतम गंभीर यांची सोशल मीडियावरील खास पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गौतम गंभीर यांनी खास पोस्ट शेअर करत बोलून दाखवली मनातली गोष्ट
टी वर्ल्ड कप जिंकून कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार केल्यावर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना श्रेय देत मनाचा मोठेपणा दाखवल्यावर आता गंभीर यांनी आता क्रिकेट चाहत्यांच्या काळजाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. भारतीय संघाचा विजय हा फक्त देवाची योजना किंवा नशीबाची साथ नव्हे तर १४० कोटी भारतीयांमुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. संघातील प्रत्येक खेळाडू खरा चॅम्पियन आहे, अशा आशयाच्या शब्दांत गंभीर यांनी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे.
गंभीर यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
गौतम गंभीर यांनी एक्स अकाउंटवरुन वर्ल्ड चॅम्पियन संघातील खेळाडूंचा फोटो शेअर करताना लिहिलंय की, "ही फक्त देवाची योजना (God's plan) नव्हती. तर ही १४० कोटी भारतीयांची योजना होती. संघातील प्रत्येक खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन आहे." सोशल गंभीर यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दोन ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कोच
भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ८ वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यात एकदा संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. दोन वनडे वर्ल्ड कपसह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० वर्ल्ड स्पर्धा ३ वेळा गाजवली आहे. गौतम गंभीर एकमेव प्रशिक्षक आहेत ज्यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसह टी-२० वर्ल्ड कपच्या रुपात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.
Web Summary : Gautam Gambhir credits India's T20 World Cup victory to the 1.4 billion Indians, not just luck. He emphasized the team's champion spirit, acknowledging their hard work and dedication, leading to the historic win, his second ICC trophy as coach.
Web Summary : गौतम गंभीर ने भारत की टी20 विश्व कप जीत का श्रेय 1.4 अरब भारतीयों को दिया, न कि सिर्फ भाग्य को। उन्होंने टीम के चैंपियन भावना पर जोर दिया, उनकी मेहनत और समर्पण को स्वीकार किया, जिससे ऐतिहासिक जीत मिली, कोच के रूप में उनकी दूसरी आईसीसी ट्रॉफी।