Join us  

गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली

निवड समितीत समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला. खेळाडूंनाच माहीत नसतं, त्यांच्या कारकीर्दीशी काय होणार आहे...यावेळी गंभीरनं स्वतःचं उदाहरण दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 2:00 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी प्रमुखे एमएसके प्रसाद यांच्यात स्टार स्पोर्ट्सच्या 'Cricket Connected' या कार्यक्रमात वाद झाल्याचे समोर आले आहे. 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून अंबाती रायुडूला वगळण्याच्या निर्णयावरून गंभीर आणि प्रसाद यांच्या जुंपली. या कार्यक्रमात कृष्णमारी श्रीकांत यांचाही सहभाग होता.

दिल्लीच्या फलंदाजानं निवड समितीत समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला. खेळाडूंनाच माहीत नसतं, त्यांच्या कारकीर्दीशी काय होणार आहे...यावेळी गंभीरनं स्वतःचं उदाहरण दिलं. 2016मध्ये इंग्लंड कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यापूर्वी कोणीच त्याच्याशी संवाद साधला नसल्याचे त्यानं सांगितले. तो म्हणाला,'' 2016मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर मला वगळले, तेव्हा कोणीच माझ्याशी संवाद साधला नव्हता. करुण नायरलाही कोणतीच कल्पना देण्यात आलेली नव्हती. तुम्ही युवराज सिंग आणि सुरेश रैना यांचंही उदाहरण पाहा.''

गंभीरनं अंबाती रायुडूचा मुद्दा उपस्थित करताच वादाला तोंड फुटलं. वर्ल्ड कप स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी रायुडूच्या नावाची चर्चा होती आणि तोही त्यासाठी तयार होता, परंतु त्याला डावलून अननुभवी विजय शंकला संघात स्थान दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत प्रसाद यांनी विजयच्या निवडीचे समर्थन करताना '3D' हा क्रायटेरिया लावल्याचे सांगितले. त्यावरून गंभीरनं प्रसाद यांना प्रश्न विचारला. तो म्हणाला,''अंबाती रायुडूला दोन वर्ष तुम्ही चौथ्या स्थानावर खेळवलं आणि वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला डावलण्यात आला. वर्ल्ड कपसाठी तुम्हाला 3Dखेळाडू हवा होता? निवड समिती अध्यक्षांकडून असं विधान अपेक्षित आहे का?''

प्रसाद यांनी स्वतःचा बचाव केला. ते म्हणाले,''आघाडीला संघात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली हे अव्वल फलंदाज होते. यापैकी कुणी गोलंदाजी करणारा नव्हता आणि त्यामुळे विजय शंकर सारख्या खेळाडूची संघाला गरज होती. इंग्लंडच्या वातावरणात त्याचा गोलंदाज म्हणूनही फायदा झाला असता. '' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video

सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव

शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार

Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग  

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघअंबाती रायुडू