Suryakumar Yadav Nora Fatehi viral video: सूर्यकुमार यादवने टी२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. आता, स्पर्धेच्या पुढील टप्प्यात त्याचा फॉर्म कायम राहण्याची अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी, सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो अभिनेत्री नोरा फतेहीच्या नृत्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ त्याची पत्नी देविका हिने चित्रित केला. त्यावेळी वेगळाच किस्सा घडला.
सूर्यकुमारचा व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ वानखेडे येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यापूर्वीचा आहे. सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन समारंभ सुरू होता, ज्यामध्ये नोरा फतेही डान्स करत होती. टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत उभे राहून परफॉर्मन्स पाहत होते. तेव्हा अचानक कॅमेरा त्यांच्यावर झूम झाला. सूर्यकुमार यादव थेट कॅमेऱ्याकडे पाहताना दिसला आणि अचानक हात वर करताना दिसला. हा व्हिडीओ त्याची पत्नी देविका शूट करत होती. इतर खेळाडूंनी हे पाहिले आणि अर्शदीप, इशान यांनी सूर्यकुमारला चिडवायला सुरुवात केली.
सूर्यकुमार यादवची दमदार खेळी
हा किस्सा फार मजेशीर होता. पण सूर्याने टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला वाचवले. पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने चार विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या फक्त ४६ धावा होती. संकटाच्या वेळी, सूर्यानेच संघाला सावरले. भारतीय कर्णधाराने ४९ चेंडूत ८४ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे भारताला १६१ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, अमेरिकन संघ फक्त १३२ धावा करू शकला आणि भारताने सामना २९ धावांनी जिंकला. भारताकडून सिराजने सर्वोत्तम गोलंदाजी केली, २९ धावांत ३ बळी घेतले. अर्शदीप सिंगने २ विकेट घेतल्या. अक्षर पटेलनेही २ विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने एक विकेट घेतली.