Video: एका चेंडूवर दोन वेळा झाला OUT... अशी 'विचित्र' विकेट कधी पाहिलेय का?

अजब गजब पद्धतीने फलंदाज झाला बाद... एकदा व्हिडीओ नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:12 PM2024-01-24T13:12:06+5:302024-01-24T13:16:05+5:30

whatsapp join usJoin us
Funny Video Marcus Stoinis got out 2 times in single ball while smash down stumps | Video: एका चेंडूवर दोन वेळा झाला OUT... अशी 'विचित्र' विकेट कधी पाहिलेय का?

Video: एका चेंडूवर दोन वेळा झाला OUT... अशी 'विचित्र' विकेट कधी पाहिलेय का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Marcus Stoinis wicket in 1 Ball: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे कठीण असते. क्रिकेटमधील अनेक सामने हे एखाद्या विकेटमुळे फिरतात किंवा एका चौकार-षटकाराने बदलतात. अशी एक विचित्र घटना दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज एकाच चेंडूवर दोनदा बाद होताना दिसला. IPL मध्ये दरवर्षी तब्बल ९ कोटींहून अधिक मानधन घेणारा हा फलंदाज म्हणजे मार्कस स्टॉयनीस. स्टॉयनीस हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो चांगल्या लयीत असला की त्याला बाद करणे कठीण जाते. पण एका सामन्यात तो चक्क एकाच चेंडूवर दोन वेळा बाद झाला. त्याचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

मार्कस स्टॉइनीस ११ धावांवर बाद झाला. डर्बन सुपर जायंट्सच्या डावाचे १५वे षटक सुरू होते. या षटकातील चौथा चेंडू ऑली स्टोनने थोडा आखूड टप्प्याचा टाकला. अतिरिक्त बाऊन्समुळे स्टॉइनीसला धक्का बसला आणि तो शॉट खेळण्यासाठी जोर लावू लागला. चेंडू त्याच्या बॅटच्या हँडलला चेंडू लागला आणि उडून स्क्वेअर लेगच्या फिल्डरने झेल घेतला. तर नंतर त्याची बॅट थेट स्टंपलाच लागली आणि त्यामुळे तो हिट विकेटदेखील झाला. पाहा व्हिडीओ-

हा सामना २३ जानेवारी SAT20 लीग मध्ये डर्बन सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स केपटाऊन या दोन संघांमध्ये खेळला गेला. मार्कस हा सामना जिंकणाऱ्या डर्बन सुपर जायंट्स संघाचा भाग होता. डर्बन सुपर जायंट्सने १५८ धावांचे लक्ष्य राखत मुंबई इंडियन्स केपटाऊनचा ३६ धावांनी पराभव केला. स्टॉयनीसने फारशा धावा केल्या नसल्या तरी सामन्यात ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले आहेत.

Web Title: Funny Video Marcus Stoinis got out 2 times in single ball while smash down stumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.