Amitabh Choudhary Died:BCCI च्या माजी अधिकाऱ्याचे अकाली निधन; वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बीसीसीआयचे माजी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:28 PM2022-08-16T18:28:53+5:302022-08-16T18:30:08+5:30

whatsapp join usJoin us
Former bcci acting secretary and former ips Mr Amitabh Choudhary die due to heart attack | Amitabh Choudhary Died:BCCI च्या माजी अधिकाऱ्याचे अकाली निधन; वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Amitabh Choudhary Died:BCCI च्या माजी अधिकाऱ्याचे अकाली निधन; वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) माजी सचिव आणि झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे (JSCA) माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी (Amitabh Choudhary) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौधरी यांच्या निधनावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

अमिताभ चौधरी यांचे निधन
रांची येथील स्थानिक हॉस्पिटलचे डॉक्टर वरुण कुमार यांनी सांगितले की, झारखंड लोकसेवा आयोगाचे (IPS) माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास आपत्कालीन वैद्यकीय कक्षात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले मात्र सकाळी जवळपास ९ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. 

सोमवारी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. मात्र त्यानंतर अशोक नगर येथील घरात त्यांनी आराम केला. झारखंड राज्य क्रिकेट संघाचे सचिव देवाशीष चक्रवर्ती यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, "झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद बातमी समजली. माजी IPS अधिकारी अमिताभ यांनी राज्यात क्रिकेटचा खेळ वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो." 

 


 

Web Title: Former bcci acting secretary and former ips Mr Amitabh Choudhary die due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.