Join us  

ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचे कॅन्सरमुळे निधन

दुखापतीनंतर डॉक्टरांनी दिला होता निवृत्तीचा सल्ला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 4:19 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू ग्रॅमी वॉटसनचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांना कॅन्सर झाला होता. मधल्या फळीचा फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेल्या वॉटसन यांनी 1967 ते 1972 या कालावधीत पाच कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले. विक्टोरियाकडून त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 1966-67च्या ऱ्होडेशिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्यांची संघात निवड झाली.

मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्यात त्यांनी पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. पण, पहिल्या डावात 11 षटकांत त्याला एकही विकेट घेता आली नाही. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे पुढील कसोटीतून त्यांनी माघारही घेतली. जोहान्सबर्ग येथील चौथ्या कसोटीत त्यांनी पुन्हा मैदानावर पाऊल ठेवले आणि 67 धावांत 2 विकेट्स घेतल्या.

टोनी ग्रेगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. सहा आठवड्यानंतर ते पुन्हा खेळले. आणि 1972च्या इंग्लंड दौऱ्यावर दोन सामने खेळले. 1971-72 मध्ये त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि तीन वेळा शेफील्ड शिल्ड स्पर्धा जिंकली.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का 

Big News : Corona Virus च्या संकटात ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती

टॅग्स :आॅस्ट्रेलिया