Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्याची मागणी शोएब अख्तरनं केली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:22 PM2020-04-25T12:22:24+5:302020-04-25T12:23:03+5:30

whatsapp join usJoin us
If you need the money that you should stop the activities at the border, Kapil Dev svg | Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा केला पाहिजे आणि त्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्याची मागणी शोएब अख्तरनं केली होती. पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलाच समाचार घेतला होता. कपिल देव यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावलं आहे. त्यांनी पाकिस्तानला एक सल्ला दिला आहे. 

'स्पोर्ट्स तक'शी बोलताना कपिल देव म्हणाले,''भारत-पाकिस्तान सामन्यांपेक्षा मुलांचे शाळेत जाणे गरजेचे आहे. पाकिस्तानला एवढीच पैशांची चणचण आहे, तर त्यांनी प्रथम सीमेवरील दहशदवाद बंद करावा. त्याच पैशांनी त्यांनी शाळा आणि हॉस्पिटल बांधावेत. क्रिकेट हा खूप नंतरची गोष्ट आहे. शाळेत जायला मिळत नसलेल्या मुलांची मला दया येते. शाळा-कॉलेजची उभारणी करा. क्रीडा स्पर्धा काय होतच राहतील.''

कपिल देव यांनी यावेळी धार्मिक संघटना, मंदिर-मस्जिद, गुरुद्वारा यांना सर्वांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं.

लॉकडाऊनमध्ये काय करतात कपिल देव?
''लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात थोडा त्रास झाला, परंतु आता सवय झालीय. गोल्फसाठी मी नेट तयार केला आहे आणि रोज 100 चेंडू हिट करण्याचा सराव करतो. गार्डनची निगा राखतो. व्यायाम करतो. घराची सफाई करतो.  

धोनीची कॉपी
महेंद्रसिंग धोनीनं 2011च्या वर्ल्ड कप विजयानंतर मुंडन केलं होतं. तो माझा हिरो आहे आणि त्याची ती स्टाईल कॉपी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशी हेअरस्टाईल केली आहे.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Web Title: If you need the money that you should stop the activities at the border, Kapil Dev svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.