Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंग धोनीने सुरु केली विश्वचषकाची तयारी

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 18:42 IST

Open in App
ठळक मुद्दे' या ' वक्तव्यामुळे धोनी झाला गंभीर

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ अजून काही देशांचे दौरे करणार आहे. त्यामुळे विश्वचषकाला अजून बराच अवधी आहे. पण भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी विश्वचषकाच्या तयारीलाही लागला आहे.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला धोनी नेट्समध्ये जास्त काळ व्यतित करत आहे. त्याचबरोबर खेळपट्टीवर चांगला समतोल कसा राखता येईल, याचाही सराव धोनी करत आहे.

' या ' वक्तव्यामुळे धोनी झाला गंभीरपेन एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, " भारताचा धोनी आणि इंग्लंडचा जोस बटलर हे दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत. पण या दोघांमध्ये एक पर्याय निवडायचा झाला तर धोनीपेक्षा बटलर हा अधिक उजवा वाटतो. कारण सध्या धोनीपेक्षा बटलरची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात धोनीपेक्षा बटलर चांगली कामगिरी करेल, असे मला वाटते. " 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटभारतइंग्लंडआॅस्ट्रेलियाइंग्लंड विरुद्ध भारतमहेंद्रसिंह धोनी