Biggest Victory Margins In ODI Cricket By Runs Top 5 Biggest Wins : दक्षिण आफ्रिकेतील साउथहॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३४२ धावांनी पराभूत केले. या मोठ्या विजयासह इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरीचा नजाराणा पेश केला. जेकब बेथेल (११०) आणि जो रूट (१००) या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ४१४ धावांचा डोंगर उभारला होता. धावांचा पाठलाग करताना जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली अन् इंग्लंडच्या संघाने मोठ्या विजयासह वनडेत नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या ४१५ धावांचे टार्गेट पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ शंभरीचा आकडाही गाठू शकला नाही. २१ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ७२ धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यासह आदिल राशीदनं ३ तर ब्रायडन कार्सनं २ विकेट्स घेत संघाच्या विक्रमी विजयात मोलाचा वाटा उचलला. याआधी वनडे सर्वाधिक धावांच्या फरकासह विजय नोंदवण्याचा विश्व विक्रम हा भारतीय संघाच्या नावे होता. २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला ३१७ धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडने हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. ५ जानेवारी १९७१ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३४० पेक्षा अधिक धावांनी एकदिवसीय सामना जिंकला आहे.
Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा
वनडेत मोठ्या धावसंख्येच्या फरकाने विजय नोंदवणारे आघाडीचे १० संघ
संघ | प्रतिस्पर्धी | फरक (धावा) | वर्ष |
---|---|---|---|
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ३४२ धावा | २०२५ |
भारत | श्रीलंका | ३१७ | २०२३ |
ऑस्ट्रेलिया | नेदरलँड्स | ३०९ | २०२३ |
झिम्बाब्वे | अमेरिका (USA) | ३०४ | २०२३ |
भारत | श्रीलंका | ३०२ | २०२३ |
न्यूझीलंड | आयर्लंड | २९० | २००८ |
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | २७६ | २०२५ |
ऑस्ट्रेलिया | अफगाणिस्तान | २७५ | २०१५ |
दक्षिण आफ्रिका | झिम्बाब्वे | २७२ | २०१० |
दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | २५८ | २०१२ |