Join us  

ENG vs AUS, 3rd ODI :  पहिल्या दोन चेंडूंत पडल्या दोन विकेट्स, त्यानंतरही इंग्लंडनं उभारला धावांचा डोंगर

ENG vs AUS, 3rd ODI : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातली तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्यानं हा तिसरा सामना निर्णायक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 9:28 PM

Open in App

जेसन रॉय आणि जो रूट यांना पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर इंग्लंडचा डाव कोसळेल असे वाटत होते. पण, मधळ्या फळीनं दमदार कामगिरी करून इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातली तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्यानं हा तिसरा सामना निर्णायक आहे. त्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी निराशाजनक सुरुवातीनंतरही धावांचा डोंगर उभा केला.

विराटच्या संघातील नव्या खेळाडूनं इंग्लंड दौरा गाजवला; कुणालाच न जमलेला विक्रम केला

प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्या दोन चेंडूंत दोन धक्के बसले. रॉयला झेलबाद करून माघारी पाठवल्यानंतर एका अप्रतिम चेंडूवर स्टार्कनं रूटला पायचीत केलं.  त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. अॅडम झम्पानं इंग्लंडच्या कर्णधाराला बाद केले. त्यापाठोपाठ आलेला जोस बटलरही लगेच माघारी परतला. पण, त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. बेअरस्टो आणि सॅम बिलिंग यांनी 114 धावांची भागीदारी करताना संघाला मोठ्या आघाडीच्या दृष्टीनं वाटचाल करून दिली.  बेअरस्टोने 126 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारासह 112 धावा केल्या. सॅम बिलिंगनेही 57 धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीनंतर ख्रिस वोक्सनं 39 चेंडूंत 6 चौकारांसह 53 धावा चोपल्या. इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना  

चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार 

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो  

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण 

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलिया