Join us

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनचा नवा संघर्ष. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली धमक दाखवून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:46 IST

Open in App

दुलीप करंडक स्पर्धेच्या आगामी सत्रासाठी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 4 संघांची घोषणा केली आहे. 5 ते 22 सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत अनेक स्टार क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड याच्याकडे  भारत क संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

सूर्याच्या कॅप्टन्सीत ऋतुराजला मिळाला होता डच्चू

श्रीलंका दौऱ्यावरील सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० संघातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. पण या संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश नव्हता. यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल सूर्यकुमार यादव यांच्या तुलनेत चांगली कामगिरी असूनही त्याला बाकावर बसावे लागले. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले होते.आता ऋतुराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्यातील क्षमता दाखवून देताना दिसेल. नेतृत्वाशिवाय बॅटिंगमध्ये तो छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सूर्यकुमार यादवही खास टार्गेट घेऊन उतरेल मैदानात

क्रिकेटच्या मैदानात धमक दाखवून टीम इंडियात चमकण्यासाठी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये क्षमता सिद्ध करावी लागते. सूर्यकुमार यादव याला टी-20 संघाचे कॅप्टन केले असले तरी वनडे आणि कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्याने वनडेसह कसोटीत खेळण्यासाठी उत्सुक असल्याची गोष्टही बोलून दाखवलीये. बांगलादेश विरुद्धच्या दौऱ्याआधी या स्पर्धेत छाप सोडून सूर्यकुमारही टीम इंडियात सर्व प्रकारात खेळण्यासाठी परिपूर्ण आहे, ते दाखवून देण्याचा प्रयत्न करेल.

चार संघ, कॅप्टन्सीत या मंडळींनी मारलाय नंबर

ऋतुराज गायकवाडशिवाय भारत अ संघाचे नेतृत्व हे शुबमन गिल करणार आहे. या संघात लोकेश राहुलचाही समावेश आहे. संग ब  आणि संघ ड या संघाचे नेतृत्व अनुक्रमे अभिमन्यू ईश्वरन आणि श्रेयस अय्यर ही मंडळी करताना दिसेल.

ऋतुराज गायकवाच्या नेतृत्वाखालील संघ 

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, बाबा इंद्रजीत, ऋतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, वैशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशु चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), संदीप वॉरियर.

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयऋतुराज गायकवाडसूर्यकुमार अशोक यादव