Duleep Trophy 2025: Shubman Gill to lead North Zone : इंग्लंड दौऱ्यावर कॅप्टन्सीत चमकलेल्या शुबमन गिलवर BCCI नं देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील प्रतिष्ठित स्पर्धेत नवी जबादारी दिलीये. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत तो उत्तर विभागाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एका बाजूला टी-२० प्रकारात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणा कुणाची वर्णी लागणार यासंदर्भातील चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला BCCI नं शुबमन गिलवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची ड्युटी दिली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय टी-२० संघातून त्याला सुट्टी दिली जाणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुबमन गिलला टी-२० पासून दूर ठेवणार की,...
दुलीप करंडक स्पर्धा ही २८ ऑगस्टपासून सुरु होत आहे. ४ सप्टेंबरला या स्पर्धेतील दोन्ही सेमी फायनल खेळवण्यात येणार असून ११ सप्टेंबरला फायनल नियोजित आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची निवड अपेक्षित आहे. शुबमन गिल हा २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने BCCI त्याला टी-२० पासून दूर ठेवत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवण्यावर भर देणार की, आयत्यावेळी त्याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड होणार ते पाहण्याजोगे असेल.
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
टी-२० मधील भारताचा यशस्वी गोलंदाजही शुबमनच्या संघात
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाच्या संघात भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगचाही समावेश आहे. आशिया कप स्पर्धेत अर्शदीप हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असेल. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी तो देशांतर्गत ड्युटी सोडून नॅशनल ड्युटी निभावण्यासाठी दुबईला रवाना होऊ शकतो. शुबमन गिलसोबतही तोच पॅटर्न दिसणार की, कॅप्टन्सीमुळे त्याला शेवटपर्यंत इथं थांबावे लागणार ते आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा झाल्यावरच स्पष्ट होईल.
असा आहे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाचा संघ शुबमन गिल (कर्णधार), शुभम खजूरिया, अंकित कुमार (उप-कर्णधार), आयुष बडोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत सिंधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंह चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, कन्हया वधावन (विकेटकीपर/बॅटर)