मुंबई : चिवट फलंदाज अर्थात ‘द वॉल’ राहुल द्रविड याने नियमितपणे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली, त्याचवेळी माजी कसोटी फलंदाज वसीम जाफर याने मात्र वेगळे मत नोंदविले. द्रविडला मी भारतीय संघाचा कायम प्रशिक्षक म्हणून पाहू इच्छित नाही, असे जाफर म्हणाला.
वसीम जाफरने कारण दिले की,‘राहुल द्रविडची एनसीएमध्ये अधिक गरज आहे. जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतो, तेव्हा त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची आवश्यकता असते. राहुल द्रविड एनसीएमध्ये अनेक युवा खेळाडूंना देशासाठी घडवितो, त्यांना आकार देतो. त्यांचा खेळ बहरताच हे खेळाडू पुढे देशासाठी दमदार कामगिरी करण्यास सज्ज होतात.’
यूट्यूब वाहिनीवर जाफर पुढे म्हणाला, ‘द्रविड श्रीलंकेत या भारतीय संघाला प्रशिक्षण देत आहे. मला खात्री आहे, की यामुळे युवा खेळाडूंचा बराच फायदा होईल.
- मला वैयक्तिकरीत्या विश्वास आहे, की तो राष्ट्रीय प्रशिक्षक होण्याच्या बाजूूचा नसावा.
- द्रविडने एनसीए येथे १९ वर्षांखालील आणि इंडिया अ खेळाडूंसह काम केले पाहिजे.
- माझ्या मते, भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू पूर्णपणे तयार उत्पादने आहेत.’